घरदेश-विदेश'आम्ही पाच वर्षात तीन सर्जिकल स्ट्राईक केले, पण तिसऱ्याबद्दल सांगणार नाही'

‘आम्ही पाच वर्षात तीन सर्जिकल स्ट्राईक केले, पण तिसऱ्याबद्दल सांगणार नाही’

Subscribe

'गेल्या पाच वर्षामध्ये तीन सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले आहेत. दोन सर्जिकल स्ट्राईकबद्दल तुम्हाला ठाऊक आहे. परंतु तिसऱ्याबद्दल तुम्हाला माहित नाही आणि ते आम्ही सांगणार नाहीत', असे केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला भाजपने सुरुवात केली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि देशाचे केंद्रिय गृहमंत्री आज कर्नाटक येथे प्रचारसभेमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी सर्जिकल एअर स्ट्राईकचा उल्लेख केला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘भाजप सरकारच्या गेल्या पाच वर्षाच्या काळात भारतीय जवान तीन वेळा बॉर्डर पार करुन पाकिस्तानात शिरले आणि तिथे एअर स्ट्राइक करुन परत आले. दोन एअर स्ट्राईकविषयी तुम्हाला माहित आहे. पंरतु, तिसऱ्या एअर स्ट्राईकबद्दल तुम्हाला ठाऊक नाही आणि आम्हीदेखील तिसऱ्या एअर स्ट्राईकबद्दल सांगू शकणार नाही.’

- Advertisement -

१४ फेब्रुवारी २०१८ रोजी जम्मू-काश्मीरच्या पूलवामा जिल्ह्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद या संघटनेने घेतली होती. भारतीय हवाई दलाने या हल्ल्यानंतर तेरा दिवसांनी पाकिस्तानात शिरुन जैश ए मोहम्मदचे तळे उद्धवस्त केले. यात २०० ते ३०० दहशतवादी मारले गेले. हे एअर स्ट्राईक करुन भारताने पूलवामा हल्ल्याचा बदला घेतला. याअगोदर तीन वर्षापूर्वी दहशतवाद्यांनी उरी येथे हल्ला केला होता. या हल्ल्याचा बदला भारताने सर्जिकल स्ट्राईक करुन घेतला होता. हे दोन्ही हल्ले जगासमोर आले आहेत. परंतु, भारताने पाकिस्तानवर आणखी एक हल्ला केल्याचास दावा राजनाथ सिंह यांनी केला आहे. परंतु, त्यासंदर्भात जास्त बोलणार नाही, असे सिंह म्हणाले आहेत.

 

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -