घरदेश-विदेशराजस्थानमध्ये केमिकलचा टँकर उलटून १० जणांचा मृत्यू

राजस्थानमध्ये केमिकलचा टँकर उलटून १० जणांचा मृत्यू

Subscribe

राजस्थानमध्ये केमिकलचा टँकर उलटून १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

राजस्थानमध्ये केमिकलचा टँकर उलटून १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. राजस्थानमधील राजसमंदमधील देसूरी महामार्गावर केमिकलने भरलेला टँकर उलटून एका कारवर पडून भीषण अपघात झाला आहे. त्यामुळे टँकरच्याखाली दबलेल्या कारमधील १० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक चिमुकली या अपघातात थोडक्यात बचावली आहे. सध्या टँकरखाली अडकलेल्या कारला आणि मृतांना बाहेर काढण्याचे काम सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारभुजाकडून देसूरीकडे जात असताना टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून टँकर उलटून समोरुन येणाऱ्या कारवर पडला. या दुर्घटनेमध्ये टँकरखाली कार आल्याने त्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रवाशांना क्रेनद्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु असून या महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -