घरदेश-विदेशराज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी आज निवडणूक!!

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी आज निवडणूक!!

Subscribe

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी आज निवडणूक होत आहे. यावेळी NDAकडून जेडीयूचे खासदार हरिवंशराय तर विरोधकांकडून काँग्रेसच्या बी. के हरिप्रसाद यांना उमेदवारी यांना देण्यात आली आहे.

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी आज निवडणूक होणार आहे. NDAकडून जेडीयूचे खासदार हरिवंशराय तर विरोधकांकडून काँग्रेसच्या बी. के हरिप्रसाद यांना उमेदवारी यांना देण्यात आली आहे. उपसभापतीपदाच्या या निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यसभेमध्ये सध्या २४४ इतके संख्याबळ आहे. उपसभापतीपदासाठी १२३ मतांची गरज आहे. भाजपच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीसाठी हरिवंशराय यांना १२६ मते मिळू शकतात. तर विरोधकांनी दिलेले उमेदवार बी. के. हरिप्रसाद यांना १११ मते मिळू शकतात. हरिवंशराय यांना राजद व्यतिरिक्त अण्णाद्रमुकच्या १३, टीएसआर काँग्रेसचे ६, वायएसआर काँग्रेसच्या २ सदस्यांचा पाठिंबा मिळू शकतो अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. सर्व राजकीय मतांची जुळवाजुळव पाहता हरिवंशराय हे विजयी होतील असा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जात आहे.

कोण आहेत हरिवंशराय?

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे विश्वासू असलेले हरिवंशराय हे जेडीयुचे राज्यसभा सदस्य आहे. त्यांना पत्रकारितेचा देखील अनुभव आहे. हरिवंशराय यांनी प्रभात या वृत्तपत्राची २५ वर्षे संपादकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याशी देखील त्यांचे उत्तम संबंध होते.

- Advertisement -

कोण आहेत हरिप्रसाद?

हरिप्रसाद हे काँग्रेसचे महासचिव आहेत. ११९० साली राज्यसभेचे सदस्य झालेले हरिप्रसाद राज्यसभेमध्ये कर्नाटकचे नेतृत्व करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -