घरदेश-विदेश९ ऑगस्टला होणार राज्यसभेच्या उपसभापतीपदाची निवडणूक

९ ऑगस्टला होणार राज्यसभेच्या उपसभापतीपदाची निवडणूक

Subscribe

राज्यसभेच्या उपसभापती पदाची निवडणूक ९ ऑगस्टला होणार आहे. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी याविषयी सोमवारी घोषणा केली. या निवडणुकीत सत्ताधरी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात चुरशीचा सामना बघायला मिळणार आहे.

राज्यसभेच्या उपसभापती पदाची निवडणूक गुरुवारी म्हणजे ९ ऑगस्टला होणार आहे. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी याविषयी सोमवारी घोषणा केली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात चुरशीची लढाई बघायला मिळणार आहे. राज्यसभेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची एकजूट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या लढाईत एनडीएकडून जेडीयूचे खासदार हरिवंश नारायण सिंह यांना उमेदवारी दिली गेली आहेत.

तीन पक्षांची महत्त्वाची भूमिका

राज्यसभेत सरकार बहुमतमध्ये नाही. त्यामुळे अपक्ष खासदारांचीही भूमिका यासाठी महत्त्वाची असणार आहे. यावेळी एनडीएमार्फत जेडीयूचे खासदार हरिवंश नारायण सिंह हे उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदार असतील. या निवडणुकीत जनता दल, टीआरएस आणि वायएसआरसीपी हे तीन पक्ष फार महत्त्वाची भूमिका निभावतील. त्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष या लहान पक्षांना आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या तिनही पक्षांचे १७ सदस्य राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. सध्या सत्ताधारी पक्षाचे रणनीतिकार या तिनही दलांच्या संपर्कात आहेत. कारण गेल्यावर्षी या तिनही पक्षांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपला समर्थन दिले होते. दरम्यान, बीजेडी पक्षाने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना समर्थन दिले होते.

- Advertisement -

यावेळी सामना जिंकणे कठीण होऊन बसले आहे

राज्यसभेच्या या निवडणुकीत एकूण २४५ सदस्य आहेत. या निवडणुकीत जिंकण्यासाठी उमेदवाराला १२२ मतांनी निवडून येणे अपेक्षित आहे. सध्या भाजप राज्यसभेत सर्वात मोठा पक्ष आहे. राज्यसभेत या पक्षाला १०६ सदस्यांचे समर्थन आहे. यात एआयएडीएमके पक्षाच्या १४ सदस्यांचा समावेश आहे. राज्यसभेत ६७ खासदारांच्या बळावर भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, परंतु तेलगू देसम पार्टीने भाजपशी नाते तोडल्यानंतर आणि शिवसेनेसोबतचे ताणले गेलेले नाते यामुळे भाजपला ही निवडणूक कठीण जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -