घरदेश-विदेशपत्रकार हत्येप्रकरणी राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा

पत्रकार हत्येप्रकरणी राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा

Subscribe

हरियाणाचे पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांड प्रकरणी डेरा सच्चा चे प्रमुख संत गुरमीत राम रहीमला न्यायालयाने दोषी ठरवले होते. आज राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी असलेला गुरमीत राम रहीमला आज न्यायायलाने हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. राम राहीमला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय ) द्वारे केली जात होती. मात्र त्याला अखेर जन्मठेपेचे शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. हरियाणाचे पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख संत गुरमीत राम रहीम सिंग याला न्यायलयाने दोषी ठरवले होते. १६ वर्षांपूर्वी झालेल्या या हत्याकांडाचा खटला सीबीआय न्यायालयात सुरु होता. न्यायाधीश जगदीप सिंग यांनी राम रहीमला दोषी ठरवले आहे. राम रहीमसोबतच अन्य चार आरोपींनाही दोषी ठरवण्यात आले आहे. निर्णयामुळे आता राम रहीमचे समर्थक हे आक्रमक होण्याची शक्यता असल्याने पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या शिक्षेची सुनावणी पंचकुलाच्या सीबीआय न्यायालयात झाली.

- Advertisement -

लैंगिक अत्याचार प्रकरणी ही दोषी

यापूर्वीही लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरून राम रहीमला अटक करून न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. राम रहीम यांना मुक्त करण्याच्या मागणीवरुन त्याच्या समर्थकांनी ठिक ठिकाणी जाळपोळ केली होती. राम रहीमला व्हिडिओ कॉन्फ्रेंरसद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान न्यायालयात प्रसारमाध्यमांना प्रवेश दिला गेला नव्हता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -