घरदेश-विदेश'रामाचा पुतळा हा अयोध्येची ओळख असेल'

‘रामाचा पुतळा हा अयोध्येची ओळख असेल’

Subscribe

अयोध्येमध्ये उभारण्यात येणारा रामाचा भव्य पुतळा हा अयोध्येची ओळख असेल असा मानस उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बोलून दाखवला आहे.

अयोध्येमध्ये उभारण्यात येणारा रामाचा पुतळा हा अयोध्येची ओळख असेल अशा शब्दात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भव्य पुतळा उभारण्याचा आपला मानस व्यक्त केला. राजधानी लखनऊमध्ये दिवाळी कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलत असताना त्यांनी आपला मानस व्यक्त केला. रामचा भव्य पुतळा हे पर्यटकाचं आकर्षण ठरेल. जमिनीची उपलब्धता पाहून त्याच्या भव्यतेबाबत निर्णय घेतला जाईल असं देखील योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. यावेळी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्याला देखील योगी आदित्यनाथ यांनी हात घातला. अयोध्येमध्ये राम मंदिर होते, ते पुन्हा बांधले देखील जाईल. पण सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच अयोध्येतील राम मंदिरांचं बांधकाम होईल असं देखील योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केल. दरम्यान, कालच ( मंगळवार ) योगी आदित्यनाथ यांनी  फैजाबाद या जिल्ह्याचं नामकरण अयोध्या करत असल्याची घोषणा केली.

वाचा – अयोध्या प्रश्नावरील सुनावणी जानेवारी २०१९पर्यंत तहकूब

राम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत

२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देखील राम मंदिराच्या बांधणीसाठी कायदा करा, जमिनीचे अधिग्रहण करा अशी मागणी केली आहे. शिवाय, शिवसेनेनं देखील राम मंदिराचा मुद्दा पुढं केल्यानं भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. २०१४ साली सत्तेवर येताना अयोध्येमध्ये राम मंदिराची बांधणी करू अशी घोषणा भाजपनं केली होती. त्याची आठवण आता भाजपला पुन्हा एकदा करून दिली आहे. त्यासाठी आता निमित्त ठरत आहे ती २०१९ची लोकसभा निवडणूक. सध्या राम मंदिराचं प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. सर्वोच्च न्यायालयानं देखील या प्रकरणाची सुनावणी जानेवारी २०१९ पर्यंत तहकूब केली आहे.

वाचा – फैजाबाद नाही तर अयोध्या!!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -