घरदेश-विदेशईशान्य मुंबईची जागा आरपीआयला द्या; रामदास आठवलेंची मागणी

ईशान्य मुंबईची जागा आरपीआयला द्या; रामदास आठवलेंची मागणी

Subscribe

भाजप शिवसेना आरपीआय महायुतीतर्फे निवडणूक लढविल्यास ईशान्य मुंबई ही जागा आपण जिंकू शकतो, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात यावा या मागणीसाठी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. रिपब्लिकन पक्षाचा एकही प्रतिनिधी लोकसभेत नसल्याने रामदास आठवले यांनी निवडून येऊन लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधित्व करावे अशी देशभरातील आंबेडकरी जनतेची मागणी आहे. ईशान्य मुंबईमधील जनतेकडून देखील हिच मागणी होत आहे. यासाठी हा मतदारसंघ आपल्याला सोडावा अशी, आग्रही मागणी आठवलेंनी अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेत केली. त्यावर उत्तर देताना भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत बोलणार असल्याचे आश्वासन आपणास दिले असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.

ईशान्य मुंबईची जागा आम्ही जिंकू शकतो 

रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व लोकसभेत असावे यासाठी आपण लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मागील वर्षभरापासून आपण दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात तयारी केली होती, असे आठवलेंनी सांगितले. मात्र शिवसेनेच्या कोट्यातील ती जागा देण्यास शिवसेनेचा विरोध झाल्याने भाजपने त्यांच्या कोट्यातील ईशान्य मुंबई ही लोकसभेची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडावी अशी आग्रही मागणी रामदास आठवले यांनी अमित शाह यांच्यांकडे केली. भाजप शिवसेना आरपीआय महायुतीतर्फे निवडणूक लढविल्यास ईशान्य मुंबई ही जागा आपण जिंकू शकतो, अशी चर्चा या भेटीत अमित शाह यांच्याशी झाली असल्याचे आठवलेंनी सांगितले.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेऊ

आठवलेंनी रिपब्लिकन पक्षाला ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सोडण्यात यावा अशी मागणी केली. मात्र त्यावर उत्तर देताना अमित शाह यांनी रामदास आठवलेंना आपण राज्यसभा सदस्य आहात तरी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ईशान्य मुंबई मतदारसंघ सोडण्याबाबतचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी रामदास आठवलेंची आज झालेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रामदास आठवलेंना उमेदवारी मिळेल की नाही हे पहाणे महत्वाचे ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -