घरताज्या घडामोडीरामदेव बाबांनी दीपिकाला दिला सल्ला

रामदेव बाबांनी दीपिकाला दिला सल्ला

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ‘छपाक’ आणि दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यामुळे चांगली चर्चेत आली आहे. दीपिकावर सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षाव तर टीकेची झोड उठली. याच पार्श्वभूमीवर योगगुरू रामदेव बाबा यांनी दीपिका पदुकोणला सल्ला दिला आहे. ‘सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्द्यांचे योग्य आकलन करून घेण्यासाठी दीपिका पदुकोणने माझ्यासारखा सल्लागार नियुक्त केला पाहिजे’, असा सल्ला रामदेव बाबांनी दिला आहे.

नक्की काय म्हणाले रामदेव बाबा?

‘दीपिकामध्ये अभिनयाचे गुण असणे ही वेगळी गोष्ट आहे. तिला सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्द्यांचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी देशाबद्दल जाणून द्यावे लागले आणि तिला वाचनही करावे लागेल. तिने हे समजून घेतल्यानंतर मोठे निर्णय घेतले पाहिजे. तसंच अशा प्रकारच्या वादाच्या प्रसंगात योग्य मार्गदर्शन घेण्यासाठी तिने माझ्यासारखा सल्लागार ठेवला पाहिजे’, असे रामदेव बाबा म्हणाले.

- Advertisement -

सीएए कायद्याला समर्थन

ज्या लोकांना सीएए कायद्याबद्दल माहित नाही, ते लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अपशब्दांचा वापर करत आहेत. हा कायदा कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेण्यासाठी तयार करण्यात आलेला नाही आहे. तर हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी तयार करण्यात आला आहे, हे पंतप्रधान मोदींनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. हे माहित असूनही काही लोक आग लावण्याचे काम करत असल्याची टीका रामदेव बाबांनी विरोधकांवर केली.

- Advertisement -

हेही वाचा – मोदींच्या भाषणावर रामकृष्ण मठातील साधू नाराज!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -