‘सरकारने आर्थिक मंदीकडे लक्ष द्यावे’, बाबा रामदेवांचा सरकारला सल्ला!

New Delhi
Durbhagya hai ek bhi sanyasi ko Bharat Ratna nahi mila, says Yog Guru Ramdev baba

आर्थिक वर्षात रोजच्या वापरातील वस्तूंचे भाव गगनाला भिडले असताना, आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर ‘बाबा रामदेव’ यांनी सरकारला सल्ला दिलाय. योग गुरू ते व्यावसायिक म्हणून ख्यातनाम असलेले ‘बाबा रामदेव’ यांनी ‘सरकारने आर्थिक मंदीकडे अधिक लक्ष दिले पाहीजे, सरकारला महागाई व रोजगार पुरवठ्यावर काम करण्याची गरज आहे’, असे शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले आहे.

बाबा रामदेव म्हणाले की, ‘विरोधी पक्ष नेत्यांनी देशहिताचा विचार केला पाहिजे’. तसेच जनसंख्या नियंत्रणावर बोलताना ते म्हणाले ‘वाढती जनसंख्या ही एखाद्या विस्फोटकाप्रमाणे आहे’. त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनसंख्या नियंत्रणाला पाठींबा दिलाय.

‘विरोधकांनी प्रत्येक वेळेस राजकारण न करता देशहिताचा विचार केला पाहीजे, एकेकाळी देशात अनेक घोटाळे होत असत. मात्र आपण देशहिताचा विचार केला पाहीजे’ असे बाबा रामदेव यांनी सांगितले. तसेच यावेळी बाबा रामदेव यांनी नागरिकत्व कायद्या विरोधात होणाऱ्या हिंसक आंदोलनाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.