लग्नाच्या पहिल्या रात्रीच नव्या नवरीचा दिर आणि नवऱ्याने केला बलात्कार

नव्या नवरीवर लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरा मुलगा आणि त्याच्या सख्या भावाने सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे सासू-सासऱ्यांनी यावेळी बाहेरुन केले होते दार बंद.

Utter pradesh
Gang raped at up
उत्तरप्रदेश नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग असतो. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री बलात्कारासारख्या मोठ्या प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळी उत्तर प्रदेश मधील एका महिलेवर आली आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री दीराने आणि नवऱ्याने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील गावात घडली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे लग्ना नंतर मुलगी सासू सासऱ्यांना आई-वडिल मानत असते. मात्र माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेत बलात्काराचा गुन्हा घडत असताना पिडितेच्या सासू सासऱ्यांनी खोलीच्या दाराला बाहेरुन कडी लावली होती. या धक्कादायक घटने नंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटने नंतर पीडित महिला रात्रभर त्याच ठिकाणी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उपचारासाठी तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महिलेची प्रकृती गंभीर

दरम्यान, बलात्काराच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. मात्र यानंतर महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सध्या तिच्या परिस्थितीत सुधारणा होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सहा मार्चला हा गुन्हा घडला आहे. या प्रकरणी महिलेने तिच्या कुटुंबीयांसोबत पोलीस स्थानकात रविवारी गुन्हा दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांनी गुरुवारी या संबंधीचे वृत्त प्रसारीत केले. बलात्काराचा गुन्हा करताना दोन्ही आरोपी हे दारुच्या नशेत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी महिलेच्या सासरच्या मंडळींवर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे.

हुंडयासाठी बलात्कार

पीडितेने दिलेल्या तक्रारी नुसार तिच्या सासरकडील मंडळींनी हुंड्यासाठी तिच्यावर बलात्कार केल्याचे म्हंटले आहे. पीडितेच्या भावाने दिलेल्या माहिती नुसार या लग्नात त्यानी ७ लाख रुपये खर्च केले असून, पैश्याच्या हव्यासापायी आणखी पैसा मिळवा यासाठी बहिणीचा छळ केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी सासरकडच्या मंडळींवर ३७६ डी, ५०३ आणि ५०४ या कलमांतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आलोक शर्मा यांनी दिली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here