संतापजनक! उत्तर प्रदेशमध्ये सख्ख्या बहिणींवर बलात्कार

उत्तर प्रदेशमध्ये सहा आणि सात वर्षांच्या अल्पवयीन चिमुरडींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

rape on two minor girls in uttar pradesh
संतापजनक! उत्तर प्रदेशमध्ये सख्ख्या बहिणींवर बलात्कार

दिवसेंदिवस मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दररोज एक घटना ऐकायला येत असून नुकतीच एक घटना समोर आली आहे. सहा आणि सात वर्षाच्या सख्ख्या बहिणींवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी फरारी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पीडित मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात सहा आणि सात वर्षाच्या दोन बहिणी खेळता खेळता गावाबाहेर गेल्या. तेव्हा एका तरुणाने दोघींना उचलून नेले आणि एका निर्जन ठिकाणी दोघींवर बलात्कार केला. तर धक्कादायक बाब म्हणजे दोघींना तिथेच टाकून पळून गेला. दोन्ही मुली रडत रडत घरी पोहोचल्या आणि सर्व हकीगत सांगितली. तेव्हा कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली. नंतर पोलिसांनी मुलींना रुग्णालयात दाखल करत त्यांची वैद्यकीय चाचणी केली. याप्रकरणी पोलिसांनी पेस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत.


हेही वाचा – चिमुरड्यांसमोरच आईवर सामुहिक बलात्काराची घटना; पाकिस्तानमधील जनसामान्य रस्त्यावर!