बलात्कार करणाऱ्याला सर्वांसमोर फाशी द्यायला हवी – इम्रान खान

imran khan threatens n war if jammu kashmir issue not addressed
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बलात्कारीविरोधात मोठं विधान केलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले आहेत की, बलात्कार करणार्‍यांना जाहीरपणे लोकांमध्ये फाशीची शिक्षा सुनावली जावी. गेल्या आठवड्यात सोमवारी जेव्हा महामार्गावर बलात्कारा झाला या घटनेबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी हे विधान केले.

गेल्या आठवड्यात दोन मुलांची आई असणारी महिला लाहोरजवळ गाडीने जात होती. तीला दोन लोकांनी थांबवले, गाडीतून खेचत बाहेर काढले. आणि नंतर बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. पाकिस्तानमधील महिलांसाठी काम करणार्‍या संस्थेने या घटनेविरोधात आवाज उठवला आहे.

इमरान खानचे असे म्हणणे आहे की, बलात्कार करणाऱ्याला सार्वजनिक ठिकाणी फासावर लटकवायला हवं. पाकिस्तानात हे करणे अवघड आहे कारण आम्हाला युरोपियन युनियनकडून विशेष व्यापार दर्जा मिळाला आहे असे केल्याने त्या स्थितीला इजा होईल. हे पाऊल आपल्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरेल.

२०१४ मध्ये पाकिस्तानला युरोपियन युनियन जनरललाइज्ड सिस्टम ऑफ प्रेफरन्स (जीएसपी-प्लस) हा दर्जा देण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानवाधिकार नियम पाळणे महत्वाचे आहे. पण यानंतर इम्रान खान म्हणाले की, उघड्यावर लटकण्याऐवजी आपण रासायनिक कास्ट्रेशन म्हणजेच केमिकल कॅस्ट्रेशन करू शकतो. पुढे बोलताना इम्रान खान म्हणाले, हत्या असो वा बलात्कार या सगळ्यांकडे एकाच दृष्टीकोनातून बघायला हवं. जेणेकरून भविष्यात ते कधीही स्त्रीवर बलात्कार करू शकणार नाहीत.

इम्रान खान म्हणाले की पोलिसांनी बलात्कारीला पकडले आहे. त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. आता दुसर्‍या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी जीपीएस, मोबाईल ट्रॅकिंग व डीएनए नमुने घेतले आहेत. बलात्काराच्या या घटनेनंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये निषेध केला जात आहे. लोकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बलात्कार करणार्‍याला फाशी द्या अशी लोकांमधून मागणी होती. फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानने बलात्कार करणार्‍यांना आणि मुलांना ठार मारणाऱ्यांना जाहीरपणे फाशी देण्याचा कायदा आणला होता, परंतु तो संमत होऊ शकला नाही.


हे ही वाचा – पवना धरणातील छोट्याश्या बेटावर व्हायच्या सुशांतच्या ड्रग्ज पार्ट्या!