आरबीआयकडून रेपो रेट कायम

Mumbai
rbi bank
(फोटो प्रातिनिधिक आहे)

भारताची शिखर बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आज त्रैमासिक धोरणाबाबत बैठक संपन्न झाली. या बैठकीत रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जशाच तसा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ६.५ टक्के रेपो रेट आहे तर ६.२५ टक्के रिव्हर्स रेपो रेट आहे. तर बँक रेट ६.७५ टक्के कायम ठेवला आहे. सहा सदस्यीय मुद्रा धोरण समितीने रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव कमी होत असून रुपयाही डॉलरच्या तुलनेत सावरत आहे. त्यामुळे पुढच्या त्रैमासिक धोरणापर्यंत हे रेपो रेट असाच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here