घरदेश-विदेशपीएमसीच्या ग्राहकांना दिलासा; २५ वरून ४० हजार रुपयांची मर्यादा वाढवली

पीएमसीच्या ग्राहकांना दिलासा; २५ वरून ४० हजार रुपयांची मर्यादा वाढवली

Subscribe

पीएमसी खारेधारकांना आता ४० हजार रुपये रक्कम काढता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासाजनक बातमी समोर आली आहे. आता या बँकेतील ग्राहकांना त्यांच्या खात्यावरुन सहा महिन्यात ४० हजार रुपये काढता येणार आहेत. यापूर्वी ग्राहकांना २५ हजार रुपयांची मर्यादा घालण्यात आली होती. मात्र, आता विविध अत्यावश्यक कारणासाठी ग्राहकांना ४० हजार रुपये रक्कम काढता येणार आहे.

- Advertisement -

२५ वरून ४० हजार रुपयांची मर्यादा वाढवली

पीएमसी बँकेच्या खातेधारकांना आरबीआयकडून दिलासा मिळाला आहे. आरबीआयने गेल्या दहा दिवसांपूर्वी २५ हजार रुपयांची मर्यादा वाढवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा या रक्कमेत वाढ करण्यात आली असून आता सहा महिन्यासाठी ४० हजार रुपये काढता येणार आहेत. त्यामुळे पीएमसीच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सुरुवातीला केवळ १ हजार रुपये काढण्याची परवानगी

पीएमसी बँकेच्या खातेधारकांना आरबीआयकडून सहा महिन्यासाठी १० हजार रुपये काढता येणार म्हणून बंधन घातले होते. त्यामुळे पीएमसीच्या ग्राहकांना गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी आणि लग्नासाठीही खात्यातून पैसे काढता येत नव्हते. ग्राहकांना या अडचणीतून सोडविण्यासाठी गंभीर आजारावरील उपचार आणि लग्नासाठी १० हजारपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी बँकेची समिती आरबीआयकडून मंजुरी मिळवणार आहे. पीएमसी बँकेतल्या घोटाळ्यानंतर आरबीआयने बँकेवर निर्बंध आणले. त्यावेळी सुरुवातीला खातेधारकांना ६ महिन्यांसाठी एकदा जास्तीत जास्त १० हजार रुपये काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. आरबीआयच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठी अडचण होत होती. तत्पूर्वी २४ सप्टेंबर रोजी आरबीआयने पीएमसीवर पहिल्यांदा निर्बंध लादले. त्यावेळी खातेधारकांना केवळ १ हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली होती.

- Advertisement -

हेही वाचा – एचडीआयएल मालमत्तेचा पैसा पीएमसी बँकेसाठी वापरा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -