घरदेश-विदेशपंतप्रधान म्हणाले, 'मी माझा मित्र गमावला'; रामविलास पासवान यांना आदरांजली

पंतप्रधान म्हणाले, ‘मी माझा मित्र गमावला’; रामविलास पासवान यांना आदरांजली

Subscribe

लोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (वय ७४) यांचे आज, बुधवारी सायंकाळी निधन झाले. त्यांचा मुलगा चिराग पासवान याने ट्विट करत आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी दिली. एनडीएमधील एक प्रमुख घटक पक्ष म्हणून लोजपची ओळख आहे. गेल्या महिन्याभरापासून ते उपचार घेत होते. रामविलास पासवान यांच्या निधनावर राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त करत सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मी माझा मित्र गमावल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

मला आज प्रचंड दु:ख झाले आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. आपल्या देशात आज पोकळी निर्माण झाली आहे. कदाचित ती कधी भरुन निघणार नाही. राम विलास पासवान यांचे निधन हे माझे वयैक्तीक नुकसान आहे. मी माझा मित्र, मौल्यवान सहकारी गमावला. प्रत्येक गरीब माणसाला सन्मानाने जगता आले पाहिजे, ही कळकळ त्यांच्या ठायी होत, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. तर काँग्रेस नेता राहुल गांधी यांनीही ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे. गरीब-दलित वर्गाने आपला बुलंद राजकीय आवाज गमावला, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाने दूरदृष्टी असलेला नेता गमावला, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. भारतीय राजकारणातील उत्तुंग व्यक्तीमत्व हरपलं, अशी प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी दिली आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आज चिराग पासवान यांना त्यांची गरज होती, असे तेजस्वी यादव यांनी ट्विट केले असून पासवान यांच्या जाण्याने बिहारच्या राजकारणाचे मोठे नुकसान झाल्याचे राबडी देवी यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय राजकारण आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची उणीव कायम जाणवेल, असे ट्विट केले. तर ऐंशीच्या दशकात स्वतंत्र व्यक्तीमत्व उभं राहिलं होतं, प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले आहे. तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गरीब आणि वंचितांच्या उत्थानासाठीचा त्यांचा संघर्ष कायम लक्षात राहिल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा –

भयंकर! तिने दिला लग्नाला नकार; त्याने रागात पेटवून दिली स्कूटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -