घरदेश-विदेशसचिन पायलट यांच्या नाराजीचं नक्की कारण काय?

सचिन पायलट यांच्या नाराजीचं नक्की कारण काय?

Subscribe

राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय भूकंपांचे धक्के दिल्लीपर्यंत बसू लागलेले असतानाच आता काँग्रेसच्या उत्तर प्रदेश पूर्व सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर आता राजस्थानची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता सचिन पायलट यांच्या बंडखोरीवर पुढे काय घडतं याकडे सगळ्या देशाचंच लक्ष लागलं आहे. त्यामुळे मध्य प्रदेशपाठोपाठ राजस्थान देखील भाजपच्या गोटात सामील होतंय की काय? आणि राजस्थाननंतर आता महाराष्ट्राचा नंबर लागणार की काय? अशी देखील चर्चा केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या कंपूतले मानले जाणारे सचिन पायलट यांनी केलेल्या बंडखोरीची चर्चा अवघ्या देशात सुरू असताना नक्की त्यांची नाराजी का आहे, याची काही कारणं समोर आली आहेत.

  • सचिन पायलट हे राजस्थानचे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र, आपल्याला हवे असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत, हवे असलेले अधिकारी-कर्मचारी मिळत नाहीत अशी तक्रार सचिन पायलट यांनी केली आहे.
  • सचिन पायलट यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं देखील आहे. मात्र, त्यांना कोणत्याही समारंभात किंवा उद्घाटनासाठी बोलावलं जात नाही.
  • राजस्थान सरकारकडून अनेक प्रकारच्या जाहिराती केल्या जातात. मात्र, या सरकारी जाहिरातींवर त्यांचा कुठेही फोटो लागत नाही.
  • सचिन पायलट यांच्या बाजूच्या आमदारांना राज्य सरकारमध्ये ५० टक्के मंत्रिपदं मिळणं अपेक्षित होतं. मात्र, तशी मंत्रिपदं त्यांच्या गटाला देण्यात आली नाहीत.
  • सर्वात धक्कादायक बाब म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री असून देखील सचिन पायलट यांचा फोन टॅप केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
  • सचिन पायलट यांना पक्षाविरोधी कारवाई केल्याची नोटीस देखील त्यांना पाठवण्यात आली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -