घरदेश-विदेशखुशखबर! तब्बल १८ लाख रुपयांचे वेतन, शाही राजवाड्यात नोकरी; पण थांबा नियम...

खुशखबर! तब्बल १८ लाख रुपयांचे वेतन, शाही राजवाड्यात नोकरी; पण थांबा नियम जाणून घ्या

Subscribe

ऐन आर्थिक संकटाच्या काळात तब्बल १८ लाख रुपयांचे वेतन आणि तेही ब्रिटीश राजघराण्यातील नोकरीतून. हे तर स्वप्नवतच वाटेल. पण ही बातमी खरी आहे. ब्रिटीश राजघराणील शाही राजवाड्यात हाऊसकीपिंगची जागा भरती सुरू आहे. ही माहिती स्वत: राजघराण्याने त्यांच्या वेबसाईटवर जाहीर केली आहे. भरती करण्यात येणारी ही हाऊसकीपिंगची जागा अॅप्रेंटिसशिप वर्ग २ या प्रकारातील असून या जागेसाठी निवड झालेल्या उमेदवाराला रॉयल पॅलेसमध्येच राहावे लागणार आहे. त्याला विंडसर कॅसलमध्ये राहावे लागेल पण सोबतच आजूबाजूच्या परिसरात आणि बकिंगहॅम पॅलेसमध्ये काम करावे लागणार आहे. त्यामुळे रॉयल पॅलेसमध्ये राहण्याची संधीदेखील त्या उमेदवाराला या नोकरीमुळे मिळणार आहे. या जागेसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत २८ ऑक्टोबर रोजी संपणार असून त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखती सुरु होणार असल्याचे समजते.

या आहेत नियम व अटी 

उमेदवाराला पॅलेसचा आतील भाग आणि त्यातील वस्तूंची निगा कशी राखायची याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान, ही जागा कायमस्वरुपात भरण्यात येत असून निवड झालेल्या उमेदवाराला १३ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर त्याला त्या पदावर कायम करण्यात येणार. उमेदवाराला इंग्लिश आणि गणित या विषयांचे ज्ञान असावे. तसे नसेल तर कामावर रुजू झाल्यानंतर काम करता करता त्याने या विषयांचे त्याने ज्ञान घेणे आवश्यक असेल. ज्यांना या आधी हाऊसकीपिंगचा अनुभव आहे त्यांना प्राधान्य देण्यात येईल, असे या जाहीरातीत म्हटले आहे. या पदासाठी तब्बल १८.५ लाख इतका पगार दिला जाणार असून त्याशिवाय या राजवाड्याच्या परिसरात राहायलाही मिळणार आहे. तसेच वर्षातून 33 दिवस सुट्टी आणि इतर रॉयल कर्मचाऱ्यांप्रमाणे अलिशान सुविधा म्हणजे टेनिस कोर्ट, स्विमिंग पूल आणि इतरही सुविधांचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये प्रवास भत्त्याचीही सोय आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

मराठा आरक्षणाबाबत सरकार पळ का काढतंय?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -