घरदेश-विदेशकुलभूषण जाधव यांच्याकडून पुनर्विचार याचिकेस नकार

कुलभूषण जाधव यांच्याकडून पुनर्विचार याचिकेस नकार

Subscribe

पाकिस्तानी सरकारचा दावा

पाकिस्तानने इराणमधून अपहरण केलेले आणि सध्या पाकिस्तानी कैदैत असलेले भारतीय नागरिक आणि माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला असल्याचा दावा पाकिस्तानी सरकारने केला आहे. तसेच जाधव यांना दुसर्‍यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याची ऑफर देण्यात आल्याचे देखील पाकिस्तानने म्हटले आहे.

माहितीनुसार, पाकिस्तानने जाधव यांना १७ जून रोजी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगितले होते, पण जाधव यांनी नकार दिला, असा दावा करत यासंदर्भात पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तांना पत्र लिहिले आहे. पाकिस्तानने दुसर्‍यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याची ऑफर दिली आहे. कुलभूषण जाधव हे २०१६ पासून पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. कुलभूषण जाधव हे हेर असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. पण हा दावा भारताने नाकारला आहे. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली पाकिस्तानी सुरक्षा दलांनी ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तान येथून कुलभूषण यांना अटक केली.

- Advertisement -

सन २०१७ मध्ये भारताने आयसीजेकडे हे प्रकरण सोपवले. गेल्या वर्षी जुलै महिन्यात कोर्टाने पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांना काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याची आणि फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्यास सांगितले होते. गेल्या वर्षी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव आणल्यामुळे पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना त्यांच्या आई आणि पत्नीला भेटण्याची परवानगी दिली होती.

मात्र, त्यावेळी पाकिस्ताननं जाधव यांच्या आई आणि पत्नीला अतिशय वाईट वागणूक दिली होती. कुलभूषण जाधव यांना भेटण्याआधी पाकिस्तानी अधिकार्‍यांनी त्यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र काढायला सांगितलं होतं. यानंतर काही दिवसांनी पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला गेला. यामध्ये कुलभूषण स्वत:ला हेर म्हणत होते. मात्र, हा व्हिडिओ पाकिस्तानच्या दबावाखाली तयार केल्याचा आरोप झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -