घरदेश-विदेशखुशखबर! Jio च्या ग्राहकांना 2 GB फ्री डेटा

खुशखबर! Jio च्या ग्राहकांना 2 GB फ्री डेटा

Subscribe

दर दिवशी रात्री १२ नंतर jio कंपनीकडून 'माय प्लान' रिफ्रेश केला जातो. त्यामुळे फ्री डेटा मिळवण्यासाठी वाट पाहावी लागते.

नेहमीप्रमाणेच रिलायन्स Jio ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर जारी केली आहे. जिओकडून प्रत्येक महिन्याला ग्राहकांना सेलिब्रेशन पॅकअंतर्गत ८ जीबी फ्री डेटा मिळणार आहे. दररोज २ जीबी डेटा असे चार दिवस म्हणजे एकूण ८ जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे. मात्र, ही विशेष ऑफर सरसकट सगळ्याच Jio ग्राहकांना मिळणार नसून, काही निवडक ग्राहकांसाठीच लागू केली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या ग्राहकांना हा फ्री डेटा मिळाला आहे, हे पाहण्यासाठी सर्वात आधी ग्राहकांना ‘माय जिओ’ अॅप डाउनलोड करावं लागणार आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला App मध्ये लॉग इन करावं लागेल. त्यानंतर अॅपच्या माय प्लान सेक्शनमध्ये जाऊन, आपला फ्री डेटा तपासावा लागेल.


महत्वाचं : तुम्ही Book My Show वापरता? मग हे वाचाच…

त्याठिकाणी तुम्हाला माय प्लानमध्ये फ्री डेटा दिसला तर तुम्ही या स्किमचे लाभार्थी आहात हे नक्की होईल. मात्र, जर तुम्हाला फ्री डेटा दिसला नाही तर, रात्री १२ वाजेपर्यंत वाट पाहावी लागेल. याचं कारण म्हणजे, दर दिवशी रात्री १२ नंतर माय प्लान रिफ्रेश केला जातो. दुसरीकडे जिओचा गीगाफायबर हा आणखी एक खास प्लानही लवकरच लाँच करण्यात येणार आहे. यासाठी कंपनी सर्व ब्रॉडबँड प्लान जारी करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, जिओच्या प्री-व्यू ऑफरमध्ये कंपनी ९० दिवसांसाठी ग्राहकांना हायस्पीड इंटरनेट देणार आहे. ग्राहकांना महिन्याला १०० जीबी डेटा मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -