घरटेक-वेकफोनमधून चीनी App काढून टाकणाऱ्या App ला Google ने प्ले स्टोअरवरून काढले!

फोनमधून चीनी App काढून टाकणाऱ्या App ला Google ने प्ले स्टोअरवरून काढले!

Subscribe

चीन आणि भारत यांच्यात सुरू असलेला तणाव आणि सोशल मीडियावर टिकटॉक विरूद्धच्या मोहिमेदरम्यान हे App खूप लोकप्रिय झाले

गुगलने Remove China Apps हे अँड्रॉइड अ‍ॅप प्ले स्टोअर वरुन काढून टाकले आहे. हे App जयपूरच्या डेव्हलपर्सने तयार केले होते. चीन आणि भारत यांच्यात सुरू असलेला तणाव आणि सोशल मीडियावर टिकटॉक विरूद्धच्या मोहिमेदरम्यान हे App खूप लोकप्रिय झाले. हे App गुगल प्ले स्टोअरच्या ५० लाखाहून अधिक युजर्सकडून डाऊनलोड करण्यात आल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

गुगलच्या एका प्रवक्त्याने वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, या App ने प्ले स्टोअरच्या धोरणाचे उल्लंघन केल्यामुळे Remove China App ला प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आले आहे. मात्र याबद्दल अधिक माहिती देण्यात आलेली नाही. App डेव्हलपर्सने असे सांगितले की, ज्यावेळी App डेव्हलपर्स गुगल प्लेच्या धोरणांच्या नियमांचे उल्लंघन करतो, त्यावेळी गुगलकडून App तयार करणाऱ्या डेव्हलपर्सला सस्पेंड करण्यात येते.

- Advertisement -

दावा केल्यानुसार, Remove China Apps शैक्षणिक उद्देशाने तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या App ला फोनमध्ये इन्टॉल केल्यानंतर, ते थेट चीनी Apps ची यादी देते. त्यामुळे युजर्स या App च्या मदतीने चीनी अ‍ॅप्स ओळखून ते आपल्या फोनमधून काढून टाकू शकतात.


फोनमधून चिनी अ‍ॅप्स काढणारे अॅप भारतात लोकप्रिय, १० लाख डाऊनलोड

हे App युजर्सच्या ByteDance च्या TikTok आणि UC Browser सारखे अ‍ॅप्स स्कॅन करतं. यासारखे चीनी App हटवल्यानंतर, ‘You are awesome no chinese app found’ असा मॅसेज येतो. परंतु, आता युजर्स Google Play वरून Remove China Apps डाऊनलोड करू शकणार नाहीत, मात्र ज्यांच्या फोनमध्ये आधीपासून ते App असेल तेच युजर्स त्याचा वापरू शकतात.

- Advertisement -

तसेच, गुगलने यापूर्वीच गूगल प्ले स्टोअरमधून TikTok App ला प्रतिस्पर्धी असणारं  Mitron App देखील काढून टाकल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -