घरदेश-विदेशखुशखबर : गृह, वाहन कर्ज स्वस्त होणार; आरबीआयकडून व्याजदरात कपात

खुशखबर : गृह, वाहन कर्ज स्वस्त होणार; आरबीआयकडून व्याजदरात कपात

Subscribe

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात केल्यामुळे आता गृह, वाहन कर्ज स्वस्त होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रिझर्व्ह बँकेने आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं आहे. रेपो दरात अनपेक्षितपणे कपात केल्यामुळे नागरिकांसाठी एक खुशखबर आहे. रेपो दरात कपात केल्यामुळे आता गृह आणि वाहन स्वस्त झाले असल्यामुळे देशवासीयांकरता ही आनंदाची बातमी आहे. रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे आता रेपो रेट ६.५० टक्क्यांवरुन ६.२५ टक्के झाले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे बँकांचे व्याजदर कमी होऊन गृह आणि वाहन स्वस्त होण्याची शक्याता आहे.

असा कमी झाला रोपो दर

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटले यांच्या नेतृत्त्वाखाली पतधोरण समितीने मंगळवारी बैठक घेतली होती. या बैठकीत रोपो दरात पाव टक्का कपात केली आहे. त्यामुळे रेपो दर ६.५० टक्क्यांवरुन ६.२५ टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो रेटमध्येही कपात करुन ६ टक्क्यांवर आणले आहेत. या कपातीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. नोव्हेंबर २०१० मध्ये रोपो दर एवढाच होता. ऑक्टोबर २०११ मध्ये तो सर्वाधिक ८.५ टक्के होता.

- Advertisement -

कर्ज स्वस्त होणार

रेपो दरातील कपात ग्राहकांपर्यंत पोहोचवा, अशी तंबीच ऊर्जित पटेल यांनी व्यावसायिक बँकांना यावेळी दिली आहे. या पार्श्वभूमीवर कर्ज स्वस्त होण्याची शक्यता बळावली आहे. पतधोरण जाहीर होताच सरकारकडून त्याचे स्वागत करण्यात आले. तसेच दर कपातीमुळे अर्थव्यवस्थेत अधिक भांडवल उपलब्ध होईल, त्यामुळे वृद्धी दर ८ टक्क्यांवर नेण्यास मदत होईल, असे सरकारने म्हटले आहे.

अर्थव्यवस्थेच्या सर्व घटकांवर दर कपातीचा चांगला परिणाम होणार आहे. तसेच गृह, वाहन आधि कर्जाचे व्याजदर देखील कमी होण्याचा निर्णय बँकांवर अवलंबून राहील. तसेच बाजारातील धारणा लक्षात घेऊन बँका निर्णय घेतील.  – पी. के. गुप्ता, एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक

- Advertisement -

भारताचा वृद्धी दर राहणार मजबूत

दक्षिण आशिया हे जागतिक पातळीवरील आर्थिक वृद्धीचे केंद्र असून, भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धी दर २०१६ मध्ये ७.६ टक्के राहील, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.


वाचा – रिझर्व्ह बँक: मान्यवर अर्थतज्ज्ञांची परंपरा खंडीत!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -