घरदेश-विदेशआता ४ महिनेआधी करता येणार रिजर्वेशन; रेल्वेने बदलले नियम

आता ४ महिनेआधी करता येणार रिजर्वेशन; रेल्वेने बदलले नियम

Subscribe

३१ मे पासून रेल्वेचे नवे नियम लागू होणार.

रेल्वे प्रवाशांना आता हळूहळू पूर्वीसारख्या सुविधा मिळायला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात १२ मेपासून १५ विशेष ट्रेन सुरु आहेत. १ जूनपासून आणखी २०० गाड्या (मेल आणि एक्सप्रेस) सुरू होणार आहेत. लॉकडाऊन दरम्यान रेल्वेने पुन्हा नियम बदलले आहेत. आता रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की प्रवासी आरक्षित तिकिटे १२० दिवस अगोदर घेऊ शकतील, म्हणजेच प्रवाशांना तिकीट रिजर्वेशन १२० दिवस अगोदर करता येणार आहे. दरम्यान, ही सुविधा ३१ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून प्रवाशांना उपलब्ध होईल. सध्या, ३० दिवसांपूर्वी तिकीट आरक्षित करता येत आहे.

यासह १ जूनपासून प्रवाशांना तत्काळ तिकिटांची आणि प्रवासासाठी चालू बुकिंगची सुविधा मिळणार आहे. ३१ मे रोजी सकाळी ८ वाजता ही सुविधा सुरू होईल. म्हणजेच ३१ जून रोजी सकाळी ८ नंतर प्रवाश्यांना १ जून रोजी तत्काळ तिकिट मिळू शकेल. याशिवाय १ जूनपासून सर्व २३० गाड्यांमध्ये पार्सल बुकिंगची सुविधादेखील उपलब्ध होणार आहे. यासाठी ३१ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून पार्सल बुकिंग काउंटर सुरू होतील.

- Advertisement -

भारतीय रेल्वेने १ जूनपासून २०० गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. २२ मेपासून तिकीट बुकिंग सुरू झाली आहे. सध्या चालणार्‍या श्रमिक स्पेशल आणि एसी स्पेशल ट्रेनपेक्षा या गाड्या वेगळ्या असतील. विशेष म्हणजे, लॉकडाऊनमुळे २२ मार्चपासून रेल्वे सेवा बंद होती. १२ मेपासून रेल्वे १५ मार्गावर ३० विशेष गाड्या चालवत आहे. या सर्व गाड्या दिल्लीहून धावत आहेत.


हेही वाचा – आता आधारकार्डच्या सहाय्याने इन्स्टंट पॅन कार्ड काढता येणार!

- Advertisement -

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सर्व २३० गाड्यांचे बुकिंग आणि तिकीट रद्द करण्याचे स्थानक, टपाल कार्यालयं, प्रवासी सुविधा केंद्र, सामान्य सेवा केंद्र आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंट्सद्वारे सुरू करण्यात आले आहेत. प्रवाशांना प्रवासाच्या एक तासापूर्वी स्टेशनवर पोहोचावं लागेल, जिथे त्यांची स्क्रिनिंग केली जाईल. प्रवाश्यांसाठी मास्क अनिवार्य असतील आणि स्टेशनवर प्रवेश आणि निर्गम गेट वेगळे असतील.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -