घरदेश-विदेशपुलवामा हल्ल्याचे पडसाद; अजमेर दर्ग्यावर पाक यात्रेकरूंना 'नो एंट्री'!

पुलवामा हल्ल्याचे पडसाद; अजमेर दर्ग्यावर पाक यात्रेकरूंना ‘नो एंट्री’!

Subscribe

पाकिस्तानातून अजमेर दर्ग्यात येणाऱ्या पाकिस्तानी यात्रेकरूंवर निर्बंध आणावेत, अशी मागणी सैय्यद जैन उल आबदिन यांनी केंद्राला केली आहे.

गुरुवारी जम्मू काश्मीर, पुलवामा येथे केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेला भ्याड आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहमद या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. हल्ल्यानंतर प्रत्येक जण हे अस्वस्थ आहेत. तसेच प्रत्येकात उद्रेक निर्माण झाला आहे. हल्ल्याचा बदला घ्या, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करा, अशा तीव्र भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

दर्ग्याच्या दिवाणांनी केल्या सूचना 

जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांचा सोक्षमोक्ष लावा, अशी मागणी होत आहे. या तीव्र भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने ठोस पाऊल उचलली आहेत. तेव्हाच राजस्थानामधील अजमेर दर्ग्यावर येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर बंदी घालावी, अशी सूचना दर्ग्याचे प्रमुख दिवाणांनी केली आहे. त्यामुळे आता पाकच्या नागरिकांना दर्ग्याचे दर्शन घेता येणार नाही.

- Advertisement -

पाकवर निर्बंध घालण्याची मागणी

सैय्यद जैन उल आबदिन यांनी अशी मागणी केली आहे की, हल्ला हा इस्लाम विरोधी आहे. त्यामुळे त्यामुळे दरवर्षी पाकिस्तानातून अजमेर दर्ग्यात येणाऱ्या मुस्लिम यात्रेकरूंवर निर्बंध आणावेत. तसेच जैश-ए-मोहमद या दहशदवादी संघटनेवर बंदी आणावी, शहिद जवानांच्या कुटुंबीयांना सरकारने १ कोटी रुपयांची मदत करावा म्हणजे त्यांची मुल शिकू शकतील आणि त्यांना सरकारी नोकरीही द्यावी, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -