घरदेश-विदेशपंतप्रधान पुन्हा सांगणार 'मन की बात'

पंतप्रधान पुन्हा सांगणार ‘मन की बात’

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आकाशवाणीवरून प्रसारित होणार प्रसिद्ध 'मन की बात' कार्यक्रम पुन्हा एकदा नागरिकांच्या भेटीला येत आहे.

जनतेशी थेट संवाद साधता यावा यासाठी सुरू करण्यात आलेला पंतप्रधानांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम पुन्हा एकदा देशवासीयांच्या भेटीला येत आहे. ३० जून रोजी या कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे. याबाबतचे ट्विट माय गर्व्हन्मेंटतर्फे करण्यात आले आहे.

माय गर्व्हमेंटने ट्वीट करून म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा पदभार स्विकारल्यानंतर पुन्हा एकदा ‘मन की बात’ भेटीला येत आहे. ३० जून पासून या कार्यक्रमाला सुरूवात होत असून तुमच्या कथा, कल्पना, सूचना या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचा हिस्सा बनू शकतात. ‘मन की बात’च्या दुसऱ्या पर्वाचा पहिला भाग ३० जून रोजी ऑल इंडिया रेडिओ वरून प्रक्षेपित होणार आहे.

- Advertisement -

२०१४च्या लोकसभा निवडणूकीत विजयी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडली. यावेळी सुरू केलेल्या ‘मन की बात’ मधून देशातील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संवाद साधला होता. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा पदभार स्विकारला आहे.

- Advertisement -

‘मन की बात’मधून उत्कृष्ट अनुभव

‘मन की बात’च्या पहिल्या पर्वाचा शेवटचा भाग २४ फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात आला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमामुळे उत्कृष्ट अनुभव मिळाल्याची भावना व्यक्त केली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -