श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट : ‘इसीस’ने स्वीकारली जबाबदारी

ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची इसीस या दहशतवादी संघटनेने जबाबदारी घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.

Colombo
sri lanka serial bomb blasts
श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट

ईस्टर संडेच्या दिवशी आठ साखळी बॉम्बस्फोटाने हादरलेल्या श्रीलंकेमध्ये सोमवारी पुन्हा एकादा आणखी एक स्फोट झाला. या साखळी बॉम्बस्फोटाची जबाबदारी इसीस या दहशतवादी संघटनेने घेतल्याची माहिती मिळाली आहे. श्रीलंकेतील बॉम्बस्फोट आम्हीच घडवल्याचा दावा इसीसस या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आला असून इसीससने आपल्या अमाक या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून श्रीलंकेतील बॉम्बस्फोट हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत तब्बल ३२१ जणांचा मृत्यू झाला असून ५०० हून अधिक जण जखमी झाल्याचे समोर आले आहे.

रविवारी, ‘ईस्टर संडे’च्या दिवशी श्रीलंकेत झालेले बॉम्बस्फोट हे न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, साखळी बॉम्बस्फोटांनंतर संपूर्ण श्रीलंका हादरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपला सिरिसेना यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. सोमवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण देशभरात आणीबाणी लागू केली आहे. कोलंबोतील एका चर्च जवळील बॉम्ब निकामी करताना सोमवारी आणखी एक स्फोट झाला असून, त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोलंबोच्या मुख्य बस स्थानकावर ८७ डेटोनेटर्स सापडल्याने श्रीलंकेत पुन्हा एकदा खळबळ उडाली असून या परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

१३ संशयितांना अटक

श्रीलंकेत ८ ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आतापर्यंत १३ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. श्रीलंका सरकारने सांगितले की, यामधील जास्त बॉम्बस्फोट हे आत्मघाती होता. मृतांमध्ये भारतीय आणि पाकिस्तानींसह एकूण ३५ परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या बॉम्बस्फोटात ३ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही केरळचे राहणारे आहेत.


वाचा – श्रीलंका बॉम्बस्फोटामुळे बॉलिवूडकरही हळहळले

वाचा – श्रीलंका बॉम्बस्फोट: ‘तोहिथ जमात’ संघटनेवर संशय, भारतात ‘या’ ठिकाणी सक्रीय


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here