घरदेश-विदेशसूड घेण्यासाठी बलात्काऱ्याच्या बहिणीवरच बलात्कार!

सूड घेण्यासाठी बलात्काऱ्याच्या बहिणीवरच बलात्कार!

Subscribe

आपल्या बहिणीवर बलात्कार केला त्याचा सूड म्हणून बलात्कार करणाऱ्याच्या बहिणीवर तरुणाने बलात्कार केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. यामध्ये नराधमांनी १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे.

उत्तर प्रदेशच्या कन्नौज येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही मुलगी आपल्या आईसोबत कन्नौज तुरुंगात जात होती. पीडित मुलीचा भाऊ कन्नौजच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. रस्त्याने चालताना एक बोलेरो कार त्यांच्यासमोर उभी राहिली. गाडीतून एक तरुण बाहेर पडला आणि तिला ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या ठिकाणी सोडून देतो असे म्हणाला. मुलीने आणि तिच्या आईने गाडीत न येण्याचे सांगितले असता त्या तरुणाने त्यांना बंदूक दाखवत मुलीला गाडीत खेचले. मुलीच्या आईने अडवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. परंतु, गाडीत त्या तरुणासोबत आणखीन तीन तरुण होते. त्यांनी मुलीच्या आईला रस्त्यावर ढकलून देत गाडी वेगाने पळवली. दरम्यान, गाडीमध्ये त्या तरुणांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर बेशुद्ध झालेल्या पीडित मुलीला रस्त्यावर फेकून पळ काढला.

आरोपींना पोलिसांनी अटक केले

दरम्यान, तेथील स्थानिक नागरिकांनी पीडित मुलीला सरकारी रुग्णालयात दाखल केले. बलात्कार करणाऱ्या तरुणांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी त्या चारही तरुणांना अटक केली असून त्यांच्या विरोधात भारतीय दंड सहिताच्या कलम ३७६ ‘ड’ आणि पोक्सो कायद्याचा खटला भरण्यात आला.

- Advertisement -

बहिणीच्या अत्याचाराचा बदला घेतला

पोलीस तपासणीत बलात्कार केलेल्या तरुणाने आपण आपल्या बहिणीवर झालेल्या बलात्काराचा बदला घेतला असल्याचे सांगितले आहे. पीडित तरुणीचा भाऊ दोन वर्षांपासून कान्नौजच्या तुरुंगामध्ये शिक्षा भोगत आहे. त्याने आरोपी मुलाच्या बहिणीवर बलात्कार केला होता. याचमुळे पीडित मुलीच्या भावाच्या विरोधात प्रचंड रोष या ओरोपीच्या मनात निर्माण झाला होता. त्यामूळे ‘खून के बदले खून’ या फिल्मी पद्धतीने आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केला. मात्र, असं करणं त्याला चांगलंच भोवलं असून त्याला आता पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -