घरदेश-विदेशरेल्वे टेंडर घोटाळ्याप्रकरणी लालूंना जामीन मंजूर

रेल्वे टेंडर घोटाळ्याप्रकरणी लालूंना जामीन मंजूर

Subscribe

रेल्वे टेंडर घोटाळ्याप्रकरणी आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना पटियाल हाऊस कोर्टाने दिलासा दिला आहे. या प्रकरणी लालू यांना गुरुवारी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

रेल्वे टेंडर घोटाळ्याप्रकरणी आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना पटियाल हाऊस कोर्टाने दिलासा दिला आहे. या प्रकरणी लालू यांना आज, गुरुवारी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तर कागदपत्रांच्या तपासणीकरता सुनावणी १९ जानेवारी २०१९ पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तसेच व्हिडिओ कॉन्फेरन्सीच्या माध्यमातून सीबीआय आणि ईडीच्या वतीने दाखल केलेल्या आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना अंतरीम जामीन मिळाला आहे.

- Advertisement -

चारा घोटाळाप्रकरणी तुरुंगात

लालू प्रसाद यादव यांना सध्या चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा झाली असून ते तुरुंगवासात आहेत. मात्र आजारपणामुळे ते रांचीच्या राजेंद्र इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसेजमध्ये उपचार घेत आहेत. यापूर्वी १९ नोव्हेंबर रोजी या प्रकरणी सुनावणी झाली होती. मात्र त्यावेळी ते व्हिडिओ कॉन्फरेंन्सीद्वारे समोर येऊ न शकल्यामुळे सुनावणी २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. तर ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत लालू यांचा मुलगा तेजस्वी आणि राबडी देवी यांना जामीन देण्यात आला होता.

- Advertisement -

हे वाचा –

वाचा : लालूंवर २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरु

वाचा : लालू प्रसाद यादव गमावू शकतात १२८ कोटींची मालमत्ता

वाचा : लालू प्रसाद यादव न्यायालयासमोर शरण; तुरुंगातून हॉस्पिटलमध्ये पाठवले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -