एअर मार्शल आर. के. एस भदोरिया यांची नवे हवाईप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे हवाईदल प्रमुख बी. एस. धनोआ हे ३० सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे आर. के. भदोरिया हे त्यांच्याकडून हे पदभार स्विकारणार आहेत. भदोरिया यांची १ मे २०१९ मे रोजी हवाईदलाच्या उपप्रमुखपदी नियुक्त करण्यात आली होती. भदोरिया हे १५ जून १९८० रोजी हवाईदलात भरती झाले होते. तसेच त्यांनी २६ प्रकारची लढाऊ विमाने उडवली आहेत. एअर मार्शल आर. के. एस. भदोरिया देखील बीएस धानोआच्या त्याच दिवशी निवृत्त होणार होते. परंतु भदौरिया यांना तीन वर्षाची मुदतवाढ मिळाली त्यामुळे वयाच्या ६२ व्या वर्षापर्यंत ते सेवेत राहणार आहेत.
आर.के.एस. भदोरिया नवे हवाईदलप्रमुख
written By My Mahanagar Team
Mumbai
एअर मार्शल आर. के. एस भदोरिया यांची नवे हवाईप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -