घरदेश-विदेशभीषण अपघात: ७ जणांचा मृत्यू, ३५ जखमी

भीषण अपघात: ७ जणांचा मृत्यू, ३५ जखमी

Subscribe

या अपघातात ५ लोकांचा जागीच मृत्यू झाला असून, २ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास उत्तरप्रदेशच्या रायबरेलीमध्ये एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून, ३५ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. या अपघातात ५ लोकांचा जागीच मृत्यू झाला तर २ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान पोलीस सध्या घटनास्थळी उपस्थित असून स्थानिक लोकांच्या मदतीने बचावाकार्य सुरु आहे. उपलब्ध माहितीनुसार, रायबरेलीच्या मदारीपूर गावाजवळ एका पिक अप व्हॅनमध्ये आणी प्रवासी बसमध्ये जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. बसमध्ये जवळपास ३० प्रवासी प्रवास करत होते, तर पिकअप व्हॅनमध्येही काही लोक होते. हाती आलेल्या माहितीनुसार, शनिवारी  मदारीपूर गावातील काही रहिवासी मुंडन कार्यासाठी पिकअप व्हॅनमधून फतेहपूरला निघाले होते. पिकअप व्हॅनने काही अंतर पार केल्यानंतर चुकीच्या दिशेने येणारी एक खासगी प्रवासी बस थेट व्हॅनवर आदळली.


वाचा: नाशिकमध्ये भरधाव कारने ७ मुलांना चिरडले 

दरम्यान या अपघाताप्रकरणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यांनी जाहीर दु:ख व्यक्त केले आहे. याशिवाय त्यांनी अपघातात मृत झालेल्यांच्या परिवारासाठी प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय जखमींना ५० हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान जखमींना चांगले उपचार मिळावेत यासाठी अधिकारी दक्ष असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

#Metoo : एम. जे. अकबर यांनी दिला राजीनामा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -