चांदीच्या कड्याकरता कापले मृतदेहाचे पाय

चांदीच्या कड्याकरता मृतदेहाचे पाय कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस अज्ञात लुटारुंचा शोध घेत आहेत.

Gujarat
robbers kill 80 yr old woman chop her legs to steal silver anklets at gujarat
चांदीचे कडे हवे म्हणून वृद्धेचे कापले पाय

चोरीसाठी क्रूर कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ८० वर्षाच्या वृद्धेची अज्ञात लुटारुंनी हत्या केली. त्यानंतर तिच्या पायात असलेले चांदीचे कडे निघत नसल्याने त्या लुटारपंनी वृद्धेचे पाय कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुजरातमधील छोटा उदेपूर या ठिकाणी ही घडली आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी ही वृद्ध महिला एकटीच घरात असल्याची माहिती समोर आली आहे. एएनआयने या संदर्भात वृत्त दिले आहे.

नेमके काय घडले?

गुजरातमधील छोटा उदेपूर या ठिकाणी एक ८० वर्षीय वृद्ध महिला राहते. ही महिला एकटीच घरात असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी तिच्या घरात प्रवेश केला. अचानक घरात लुटारुनी प्रवेश केल्याने वृद्धेने आरडाओरड केला. वृद्ध महिला आरडाओरड करत असल्याने या लुटारुनी त्या महिलेचा गळा चिरला आणि तिची हत्या केली. घरातील सामानाची चोरी झाल्यानंतर लुटारुनी त्या ठिकाणाहून पळ काढताना त्यांना त्या महिलेच्या पायात चांदीचे कडे दिसले. हे कडे महिलेच्या पायातून काढण्याचा लुटारुनी प्रयत्न केला. मात्र कडे निघत नसल्याचे लक्षात आल्यानंतर लुटारुनी तिच्या मृतदेहाचे पायही कापले आणि कडे घेऊन पळ काढला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच श्वान पथकाच्या मदतीने या अज्ञात लुटारुंचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


वाचा – बुटाच्या लेसने गळा दाबून खून


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here