घरदेश-विदेशअरेच्चा! सीसीटीव्ही रेकॉर्डर समजून सेटटॉप बॉक्सच पळवला

अरेच्चा! सीसीटीव्ही रेकॉर्डर समजून सेटटॉप बॉक्सच पळवला

Subscribe

सीसीटीव्ही रेकॉर्डर समजून चोरट्यांनी सेटटॉप बॉक्सच पळवल्याची घटना दिल्लीमध्ये घडली आहे.

दिल्लीतील एका सराफाचे दुकान लुटल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. या चोरट्यांनी दुकानातून तब्बल २६ लाखांचा ऐवज लुटल्याचे समोर आले आहे. ही घटना दिल्लीतील बेगमपूर येथे शनिवारी दुपारच्या सुमारस घडली आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्हीमध्ये आपण दिसू नये, याकरता या चोरट्यांनी सीसीटीव्हीची डिजीटल रेकोर्डर घेऊन पलायन केले होते. मात्र, चोरट्यांनी सीसीटीव्हीचे डिजीटल रेकॉर्डर समजून चक्क सेटटॉप बॉक्स सोबत नेल्याचे समोर आले आहे. चोरट्यांचा हा सर्व प्रताप सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचे फुटेज आता पोलिसांकडे आहेत. पोलिसांकडे असलेल्या सीसीटीव्हीच्या डीव्हीआरमध्ये चार चोरटे असून या चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. त्यामुळे सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन चोरट्यांना शोधणे सोपे जाणार असल्याचे रोहिणी विभागाचे पोलिस उपायुक्त एस डी मिश्रा यांनी सांगितले आहे.

नेमके काय घडले?

दिल्लीतील बेगमपूर येथे शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे. दुकानमालक गुलशन हे एकटेच आपल्या दुकानात बसले होते. दरम्यान, दोन व्यक्ती ग्राहक म्हणून त्यांच्या दुकानात आल्या आणि त्यांनी दागिने घेण्यसाठी चर्चा सुरु केली. त्यानंतर त्यांच्या मागून अजून दोन जणांनी दुकानामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यातील तिघांनी पिस्तुलचा धाक दाखवत दुकानातील दागिने घेऊ लागले. त्यातील एकाने दुकानातील रोख रक्कम हिसकावून एकूण २५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान, या चोरट्यांचे लक्ष अचानक सीसीटीव्हीकडे गेले. त्यांनी लगेच सीसीटीव्हीचा डीजीटल रेकॉर्डर शोधम्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्यांना एक उपकरण दिसले आणि त्यांनी ते सीसीटीव्ही रेकोर्ड समजून त्यांनी उचकटून आपल्याबरोबर घेऊन गेले. मात्र, जे चोरट्यांनी जे उपकरण आपल्यासोबत नेते ते रेकोर्डर नसून सेटटॉप बॉक्स सोबत नेल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘या’ वस्तूने पुरुषाचा वेशात महिलेने केले मुलींचे लैंगिक शोषण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -