पहिल्याकडून उकळले कोटी, दुसऱ्याकडून लाखो, लग्न मात्र तिसऱ्याबरोबर

या तरुणीने शादी डॉट कॉम माध्यमातून तरुणांना फसवले.

robbery bride cheated two husband and went California with 3rd husband
पहिल्याकडून उकळले कोटी, दुसऱ्याकडून लाखो, लग्न मात्र तिसऱ्याबरोबर

झारखंडमधील चात्र जिल्ह्यातील इटखोरी येथील एका तरुण मुलीने शादी डॉट कॉम (Shaadi.com)च्या माध्यमातून तीन तरुणांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. शादी डॉट कॉमवर गिरिडीहच्या तरुणाशी संपर्क साधला आणि त्याच्याशी लग्न केले. त्यानंतर त्याच्याकडून एक कोटी रुपये उकळले आणि पुन्हा तिने शादी डॉट कॉमवर अविवाहित स्टेटस ठेवून एका गुजरातमधल्या तरुणाला फसवण्याचा सापळा रचला. त्या तरुणाला देखील तिने ४५ लाख रुपयांचा चुना लावला. मग तिने पुण्यातील एका तरुणाला अविवाहित असल्याचे सांगून त्यांच्याशी लग्न केले.

लग्न झाल्यानंतर ती तिसऱ्या तरुणासोबत कॅलिफोर्नियाला गेली. मग तिसऱ्या नवऱ्याच्या आईने पुण्यात आणि दुसऱ्या तरुणाने गुजरातमधील राजकोटी येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान चात्र येथील इटखोरी मधील महिलेचा पासपोर्ट तपासण्यात गुंतलेल्या पोलिसांसमोर हे प्रकरण उघड झाले आहे. पहिल्या नवरा देखील आता फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहे. गुजरातमधील तरुण अमित गुप्ता याचे प्रकरण पाहणारे हायकोर्टचे वकील अखुरी आमित म्हणतात की, ‘स्वतः अविवाहित असल्याचे सांगून तरुणांना फसवणे आणि त्यांच्याकडून पैस उकळणे हा तिचा स्वभाव आहे.’

या तरुणीने पहिले लग्न केले रांचीच्या एका हॉटेलमध्ये

चात्र जिल्ह्यातील इटखोरी पोलिसांच्या माहितीनुसार, २७ एप्रिल २०१५ रोजी गिरिडीहमधील राजधनवार येथे राहणाऱ्या निलय कुमारसोबत हिंदू रिती-रिवाज पद्धतीने तिने लग्न केले. रांची स्टेशन रोडवरील हॉटेल एलिमेंटमध्ये हा लग्न सोहळा पार पडला. त्यानंतर दोन वर्षात दोघे एकमेकांपासून दूर गेले. मग या तरुणीने निलयकडून १ कोटी रुपये उकळले आणि अविवाहित असल्याचा दावा करत गुजरातच्या अमित गुप्ता यांच्याबरोबर राहण्यास सुरुवात केली. तिने कुटुंबात अर्थिक अडचण असल्याचे सांगून अमितकडून ४० ते ४५ लाख रुपये लुटलले. दरम्यान तिच्या पहिल्या नवऱ्याने तिच्या विरोधात रांचीच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. ११ मे २०१८मध्ये हा अर्ज नाकारला गेला.

तिसऱ्या नवऱ्याच्या आईने पाडले पितळ उघड 

अमित गुप्तासोबत राहिल्यानंतर काही महिन्यांनी तिने आपल्या बहिणीचे घर शिफ्ट करण्याचे कारण देऊन ती दिल्लीला राहायला गेली. त्यानंतर ती पुन्हा परतली नाही. मग २९ डिसेंबर २०१८ला तरुणीने पुण्यातील सुमित दशरथ पवार सोबत लग्न केल्याचे अमितला समजले. याचा खुलासा सुमितच्या आईने केला.

तिसऱ्या तरुणासोबत लग्न करताना

जेव्हा सुमितच्या आईने मोबाईवर अमितचे कॉल पाहिले आणि त्यामध्ये तिचे आणि अमितचे फोटो देखील पाहिले. तेव्हा सुमितच्या आईने अमितला फोन करून तरुणीबाब सर्व सत्य सांगितले. त्यानंतर तरुणीने सुमितला आपल्या जाळ्यात अडकवून कॅलिफोर्नियाला गेली. दरम्यान पुणे पोलिसांनी चात्र पोलिसांना या मुलीची चौकशी करण्यास सांगितले होते.