घरदेश-विदेशचोरी केल्याचा मिळतो पगार

चोरी केल्याचा मिळतो पगार

Subscribe

चोरांकडून मासिक पगारावर काम करुन घेणारी टोळी जेरबंद. चोरांना पागारावर कामावर ठेवून दिला जात होता टार्गेट. ३३ मोबाईल, लॅपटॉप,२ सोनसाखळ्या आणि चार दुचाकी केल्या हस्तगत.

चोरी करणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो. मात्र अनेक चोर पकडल्या गेल्यानंतर ही चोरी करणे थांबवत नाही. चोरीची सवय लागल्यामुळे अनेकांसाठी चोरी हा गुन्हा नसून काम बनते. सर्वसामान्य नागरिक ऑफिसला जातात. महिनाभर काम केल्यानंतर त्यांना पगार मिळतो. बहूतेक कार्यालयात कर्मचाऱ्यांना टाग्रेटही दिला जातो. याच प्रकारे चोरीला काम समजणाऱ्या चोरांच्या टोळीला नुकतेच पकडले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या वस्तू चोरणाऱ्या या चोरांनाही पगार दिला जातो. याचबरोबर चोरांना ठरवून दिलेल्या किमतीचे सामान दररोज चोरी करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास त्या दिवसाचा पगार कापण्यात येतो.

महिना १५ हजार रुपये पगार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही टोळी जयपूर आणि इतर भागात सक्रीय आहे. टोळीमध्ये नेहेमी नवीन मुले चोरी करण्यासाठी सामील होतात. नवीन चोरांना महिन्याला १५ हजार रुपये पगार मिळतो. अनुभवाच्या आधारावर या चोरांचा पगार ठरतो. या चोरांना दिवसाला एक ठरावीक टाग्रेट दिला जातो. टाग्रेटमध्ये ठरलेल्या रकमेचे सामान या चोरांना चोरणे आवश्यक आहे. जयपूर पोलिसांनी एका २१ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या चोराकडून पोलिसांना ही माहिती मिळाली आहे. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी या टोळीच्या सात चोरांना अटक केले आहे.

- Advertisement -

जवाहर सर्कल क्षेत्र, शिवदासपुरा, खो नागरोरियान, सनागनेर आणि शहरातील इतर ठिकाणी ही टोळी सक्रीय आहे. ही टोळी या परिसरांमध्ये सोनसाखळी टोळी, मोबाईल, मोल्यवान वस्तू आणि दुचाकी चोरी करत होते. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर या टोळीवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. रविवारी प्रतापनगर परिसरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांना सापळा रचून पकडण्यात आले. यांच्या जवळून ३३ मोबाईल फोन्स, एक लॅपटॉप, दोन सोनसाखळ्या आणि चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत. चोरीचा माल विकल्यानंतर मिळालेले पैसे टोळीच्या म्होरक्याकडून बँकेत जमा केले जातात.

“पकडलेले सर्व चोर हे सुशिक्षित नाहीत. नोकरी नसल्याने ही टोळी चोरी करते चोरी केल्यामुळे त्यांना पगार मिळतो. कराडली जिल्ह्यातील नंदराम मीना (२०), लखन मीना (२२), इंद्रराज बेरवा (१९), सलमान खान (२३), खलील (२४) आणि कपिल मीना (२०) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.”- जयपूर पोलीस उपायुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -