रॉबर्ट वाड्रामुळे प्रियंका गांधी कोर्टात

काँग्रेस कार्यालयाबाहेर दोन अधिकाऱ्यांची पोस्टर्स लावण्यात आले आहे. या पोस्टर्सवर राहुल गांधी आरोपी नंबर एक आणि रॉबर्ट वाड्रा आरोपी नंबर दोन असे लिहिले आहे.

Delhi
robert vadra
रॉबर्ट वड्रा

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वाड्राची चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी रॉबर्ट वाड्रा ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि काँग्रेसची सरचिटणीस प्रियंका गांधी देखील दाखल झाल्या. मात्र वाड्रा यांना ईडीच्या कार्यालयाबाहेर सोडून प्रियंका गांधी निघून गेल्या. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीचे चार अधिकारी रॉबर्ट वाड्रांची चौकशी करणार आहेत. वाड्रांसोबत त्यांच्या वकिलांची टीम देखील ईडी कार्यालयात दाखल झाली आहे. मात्र चौकशी दरम्यान वाड्रांच्या वकीलांना त्यांच्यासोबत बसण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

वाड्रांची लंडनमध्ये कोट्यावधीची संपत्ती

ईडीसमोर रॉबर्ट वाड्रा चौकशीसाठी उपस्थित राहण्याआधी भाजपने एक पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर लक्ष्य केले होते. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी अशी टीका केली की, ‘युपीए १ च्या काळात रॉबर्ट वाड्रांनी लंडनमध्ये कोट्यवधींची मालमत्ता जमवली आहे. रॉबर्ट वाड्रा यांच्या लंडनमध्ये एक-दोन नाही तर तब्बल ८ मालमत्ता आहेत. काँग्रेस कार्यालयाबाहेर दोन अधिकाऱ्यांची पोस्टर्स लावण्यात आले आहे. या पोस्टर्सवर राहुल गांधी आरोपी नंबर एक आणि रॉबर्ट वाड्रा आरोपी नंबर दोन असे लिहिले आहे. तसंच, भ्रष्टाचार काँग्रेसचा अंजेडा अल्याचे देखील पोस्टर्सवर लिहिले आहे.

वाड्रांना कोर्टाने दिले आदेश 

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने रॉबर्ट वाड्रा यांना १६ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन दिला होता. त्याचसोबत कोर्टाने त्यांना आदेश दिले होते की, ते सहा फेब्रुवारीला कोर्टातमध्ये चौकशीसाठी उपस्थित रहावे. वाड्रा यांनी याप्रकरणी जामीनासाठी कोर्टामध्ये धाव घेतली आहे. कोर्टाने त्यांना असे निर्देश दिले होते की, ते ईडीच्या चौकशीमध्ये सहभागी व्हावे. यावेळी ईडीचे अधिकारी वाड्रा यांना लंडनमध्ये अलेल्या मालमत्तांच्या खरेदी आणि मालकी हक्कीसंदर्भात प्रश्न उपस्थित करतील. मनी लॉड्रिंग प्रतिबंध कायद्याखाली त्याचा जबाब नोंदवला जाईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here