घरदेश-विदेशरॉबर्ट वाड्रा यांची ९ तास चौकशी

रॉबर्ट वाड्रा यांची ९ तास चौकशी

Subscribe

जवळपास ९ तास त्यांची चौकशी झाली. या चौकशी दरम्यान ईडीने पुरावे सादर करत वाड्रांना ४० प्रश्न विचारल्याचे समजते

मनी लाँड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची मॅरेथॉन चौकशी सुरु आहे. बुधवार दुपारपासून रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे. रॉबर्ट वाड्रा यांची बुधवारी ५ तास चौकशी झाली. त्यानंतर आज रॉबर्ट वाड्रा यांची जवळपास ९ तास चौकशी झाली. ९.२० च्या सुमारास रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी पूर्ण झाली. त्यानंतर त्यांना नेण्यासाठी पत्नी प्रियंका गांधी ईडीच्या कार्यालयाबाहेर आल्या होत्या.

- Advertisement -

रॉबर्ट वाड्रा बुधवारी दुपारी चार वाजता ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यांना सोडण्यासाठी प्रियंका गांधी आल्या होत्या. दिवसभर झालेल्या चौकशीनंतर रात्री १० वाजता त्यांची चौकशी पूर्ण झाली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास ६ तासामध्ये त्यांना ४२ प्रश्न विचारले. लंडनमधील बेकायदेशीर मालमत्ता प्रकरणी वाड्रा यांची चौकशी करण्यात आली. वाड्रा यांच्यासोबत कार्ति चिदंबरमसह वकील देखील ईडीच्या कार्यालयात हजर होते. ३ अधिकाऱ्यांच्या टीमने वाड्रा यांची काल चौकशी केली होती.

- Advertisement -

आज देखील रॉबर्ट वाड्रा यांची दिवसभर चौकशी झाली. जवळपास ९ तास त्यांची चौकशी झाली. या चौकशी दरम्यान ईडीने पुरावे सादर करत वाड्रांना ४० प्रश्न विचारल्याचे समजते. दरम्यान, ईडी वड्रा यांच्या चौकशीची माहिती फोडत असल्याचा आरोप त्यांचे वकील केटीएस तुलसी यांनी केला. तसेच वड्रांविरोधात कोणतेही ठोस पुरावे त्यांच्याकडे नसल्याचा दावाही केला.

हेही वाचा – 

रॉबर्ट वाड्रामुळे प्रियंका गांधी कोर्टात

रॉबर्ट वड्राच्या कंपन्यांवर ईडीचे छापे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -