घरदेश-विदेशक्या बात! आता 'ऑलिम्पिक'मध्ये असेल रोबोंचाही सहभाग

क्या बात! आता ‘ऑलिम्पिक’मध्ये असेल रोबोंचाही सहभाग

Subscribe

जगभरातील बहुतांशी खेळाडूंसाठी ‘ऑलिम्पिक स्पर्धा’ ही खूप मोठी प्रेरणा असते. त्यातही ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायला मिळणं हे प्रत्येक खेळाडूसाठी स्वप्नवत असतं. पण एखाद्या रोबोने ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतल्याचं आजवरच्या इतिहासात तरी घडलेलं नाही. मात्र, २०२० च्या आगामी ऑलिम्पिकमध्ये मैदानात आणि मैदानाबाहेर मोठ्या प्रमाणात रोबोंचा वापर करण्यात येणार आहे. २०२० च्या ऑलिम्पिक स्पर्धांचं यजमानपद जपानला मिळालं आहे. जपान हा देश अद्ययावत तंत्रज्ञान आणि अफाट कल्पना शक्तीचा संगम आहे. याशिवाय नवनवीन आणि जगावेळगळे प्रयोग राबवण्यातही जपानची ख्याती आहे. याच धर्तीवर जपान २०२० च्या आगामी टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रोबोट्सना उतरवणार आहे.

रोबो करणार ही सर्व कामं…

ऑलिम्पिकच्या स्पर्धांमध्ये हे रोबो खेळाडूंना चेंडू देणे, पाणी देणे ही कामं करणार आहेत. त्यासोबतच स्पर्धा पाहण्यासाठी जगभरातून येणार्‍या पाहुण्यांना स्टेशन अथवा विमानतळावर उतरल्यानंतर मैदानापर्यंत पोहचण्यासाठीचं सर्व मार्गदर्शन करणार आहेत. इतकंच नाही तर पाहुण्यांना त्यांच्या साहित्याबरोबरच त्यांच्या हॉटेलवर पोहोचवण्यास मदत करणार आहेत. याबरोबरच हे रोबो या पाहुण्यांना रेल्वे व बसचीदेखील माहिती देतील. अशाप्रकारची सेवा देणारे २ रोबो जपानने नुकतेच जगासमोर लाँच केले आहेत. मात्र, ऑलिम्पिक स्पर्धांसाठी या रोबोंची संख्या वाढण्यात येणार असून, सर्व रोबो रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रीत केले जातील, अशी माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, १९६४ सालानंतर आता २०२० मध्ये पुन्हा एकदा जपानला ऑलिम्पिकचं यजमान पद भूषवण्याचा मान मिळाला आहे. अशाप्रकारे रोबोनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची हे पहिलीच वेळ असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -