घरदेश-विदेशमिथून चक्रवर्तीच्या मुलावर बलात्काराचा आरोप

मिथून चक्रवर्तीच्या मुलावर बलात्काराचा आरोप

Subscribe

बॉलिवूड सुपरस्टार मिथून चक्रवर्तीचा मुलगा आणि पत्नी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे दिल्लीतील रोहणी कोर्टाने आदेश दिले आहेत. फसवणुक, बलात्कार आणि गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत.

बॉलिवूड सुपरस्टार मिथून चक्रवर्तीचा मुलगा महाक्षय आणि पत्नी योगिता बाली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत. मिथुन याचा मुलगा महाक्षय आणि पत्नी योगितावर फसवणुक, बलात्कार आणि गर्भपाताचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

भोजपूरी चित्रपटातील अभिनेत्रीने केले आरोप

मिथून चक्रवर्ती याचा मुलगा महाक्षय आणि मदालसा शर्मा यांचे ७ जुलैला लग्न होणार आहे. मदालसा ही बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री शीला शर्मा आणि प्रसिध्द दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे. महाक्षय आणि मदालसा यांच्या लग्नाच्या पाच दिवस आधीच मिथून याच्या मुलावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. तर पत्नी योगिता यांच्यावर गर्भपाताचे आरोप करण्यात आले आहेत. भोजपूरी चित्रपटातील एका प्रसिध्द अभिनेत्रीने त्यांच्यावर हे आरोप केले आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

महाक्षय चक्रवर्ती याने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप या अभिनेत्रीने केलाय. २०१५मध्ये महाक्षयने कोलड्रींगमध्ये गुंगीचे औषध मिसळून बलात्कार केला. त्यानंतर वारंवार लग्नाचे आमिष दाखवून महाक्षयने बलात्कार केल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. चार वर्षाच्या प्रेमसंबंधामध्ये ही अभिनेत्री प्रेगनेंट राहिली. त्यानंतर महाक्षय आणि त्याची आई योगिताने जबरदस्ती गोळ्या खायला देऊन गर्भपात केल्याचा गंभीर आरोप या अभिनेत्रीने केला आहे.

- Advertisement -

गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

याप्रकरणी पीडित अभिनेत्रीने महाक्षय आणि योगिता बाली यांच्याविरोधात कोर्टात धाव घेत दाद मागितली. दरम्यान, दिल्लीच्या रोहिणी न्यायालयाने या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. बुगलपुरा पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात बलात्कार, फसवणुक आणि जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -