घरदेश-विदेशयोगींच्या युपीत संघाच्या कार्यकर्त्याची हत्या

योगींच्या युपीत संघाच्या कार्यकर्त्याची हत्या

Subscribe

केरळपाठोपाठ आता योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशमध्ये आरएसएसच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे आसएसएस आणि भाजपसह उत्तर प्रदेशमधील हिंदूत्ववादी संघटनांच्या गोटात अशांतता पसरली आहे.

उत्तर प्रदेशमधील सामाजिक वातावरण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. गोरक्षकांनी राज्यातील वातावरण ढवळून काढलेले आहे. काही महिन्यांपुर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची राज्यात विटंबना होण्याच्या घटना घडल्या. स्त्रियांच्या सुरक्षेविषयी राज्य सरकार उदासीन असल्याचे पहायला मिळते. या सर्व गोष्टींना युपीमधील भाजप सरकार जबाबदार असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यातच भर म्हणून युपीत आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे योगींच्या चिंतेत नक्कीच वाढ झाली आहे. मंगळवारी रात्री उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथे भर लोकवस्तीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवा संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवा संघाशी संलग्न असलेल्या भाजपची उत्तर प्रदेशात सत्ता आहे. आरएसएसच्याच राज्यात त्यांचे स्वत:चे कार्यकर्ते सुरक्षित नाहीत, तिथे सामान्यांच्या सुरक्षेविषयी न बोललेलं बरं, असा आरोप विरोधकांनी आता केला आहे.

अशी झाली हत्या 

मंगळवारी रात्री फिरोजाबाद येथे आरएसएसचे कार्यकर्ते असलेले संदीप शर्मा (वय ३२) हे जेवणकरून फिरायला घराबाहेर पडले होते. यावेळी दोन जण दुचाकीवरून आले आणि शर्मा यांच्यावर गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिकांनी जखमी झालेल्या संदीप शर्मांना रूग्णालयात दाखल केले. परंतु, रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. हत्या का झाली? याबद्दल गूढ कायम आहे. शर्मा हे मुळचे निकाऊ या गावातील रहिवासी असून ते संघाचे महानगर पर्यावरण समितीचे अध्यक्ष होते. याप्रकरणी फिरोजाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच गेल्या वर्षभरात केरळमध्ये आरएसएसच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या होत्या. आता युपीमध्येदेखील त्याची पूनरावृत्ती झाल्याने आरएसएसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

पोलीस तपास सुरू

घटनेनंतर भाजपा, आरएसएस आणि स्थानिक हिंदूत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रूग्णालयात आले होते. त्यांनी रुग्णालयात गोंधळ स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर पांढऱ्या रंगाच्या अपाचे दुचाकीवरुन आले होते. या हल्ल्यात शर्मा यांच्या पाठीला गोळी लागली. शर्मा यांचे कोणाशी शत्रूत्व होते का? याबाबतही पोलीस चौकशी करत आहेत.

आम्ही यासंदर्भात गुन्हा नोंदवला आहे. तपासासाठी विशेष सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. गुन्हेगारांना आम्ही लवकरच पकडू.
– राजा श्रीवास्तव, पोलीस महासंचालक, आग्रा विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -