घरदेश-विदेशसुशिक्षित कुटुंबांमध्येच घटस्फोट जास्त - सरसंघचालक

सुशिक्षित कुटुंबांमध्येच घटस्फोट जास्त – सरसंघचालक

Subscribe

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘शिक्षण आणि संपत्तीमुळे माणसांमध्ये गर्व येतो आणि त्यामुळेच अशा कुटुंबांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण जास्त असतं’, असं मोहन भागवत म्हणाले आहेत. ‘भारतीय समाज व्यवस्थेला हिंदू समाजव्यवस्थेशिवाय दुसरा पर्याय नाही कारण हिंदु समाजव्यवस्थेत कुटुंबाप्रमाणे वागण्याला पर्याय नाही’, असं देखील ते म्हणाले आहेत. अहमदाबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांसाठी आयोजित एका कार्यक्रमामध्ये मोहन भागवत यांनी ही भूमिका मांडली. ‘सध्या घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलं आहे. क्षुल्लक गोष्टींवर देखील लोकं भांडतात. सधन आणि सुशिक्षित कुटुंबांमध्येच अशा घटस्फोटांचं प्रमाण जास्त आहे. समाज देखील एक कुटुंबासारखाच असून तो देखील अशा गर्विष्ट व्यक्तींमध्ये दुभंगला जातो’, असं भागवत यावेळी म्हणाले.

‘महिलांना डांबून ठेवल्यानेच आज ही अवस्था’

दरम्यान, यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी महिलांच्या स्वातंत्र्याविषयी देखील आपली भूमिका मांडली. ‘महिलांना इतक्या वर्षांपासून घरातच ठेवल्यामुळेच आज आपल्या समाजाची ही अवस्था झाली आहे. गेल्या २ हजार वर्षांपासून आपण हीच पद्धत पाळत आहोत. त्याआधी ही परिस्थिती नव्हती. तो आपल्या समाजाचा सुवर्णकाळ होता. जेव्हा आपण हिंदू समाजाविषयी बोलतो, तेव्हा त्यात फक्त पुरुष येत नाहीत, महिला देखील येतात’, असं त्यांनी यावेळी नमूद केलं.


हेही वाचा – मॉब लिंचिगशी संघाचा संबंध नाही-मोहन भागवत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -