घरदेश-विदेशआरएसएसच्या नेत्याने मोडली शबरीमाला मंदिराची परंपरा

आरएसएसच्या नेत्याने मोडली शबरीमाला मंदिराची परंपरा

Subscribe

शबरीमाला मंदिराची परंपरा आणि रितीरिवाज वाचवण्याच्या नादात आरएसएसचा एक नेता आणि मंदिर बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने परंपरेचे उल्लंघन केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

केरळचे प्रसिध्द शबरीमाला मंदिर जवळपास २४ तास खुले ठेवल्यानंतर मंगळवारी रात्री बंद करण्यात आले. यावेळी शबरीमाला मंदिराची परंपरा आणि रितीरिवाज वाचवण्याच्या नादात आरएसएसचा एक नेता आणि मंदिर बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने परंपरेचे उल्लंघन केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. हे दोघेही पूजेच्या साहित्याशिवाय मंदिराच्या १८ पायऱ्या चढले. परंपरेच्याविरोधात जाऊन संघ नेत्याने हे कृत्य केल्यामुळे शबरीमाला भक्तांनी संताप व्यक्त केलाय.

पुजेचे साहित्य न घेता पायऱ्या चढल्या

संघाचे नेते वल्सान थिल्लानकेरी हे पूजेच्या साहित्याशिवाय मंदिराच्या गर्भगृहाकडे जाणाऱ्या १८ पायऱ्या चढताना वृत्तवाहिन्यांनी दाखविले. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरुन थिल्लानकेरी यांनी सांगितले की, मी मंदिराच्या कोणत्याही परंपरेचं उल्लंघन केले नाही. त्याचबरोबर पूजेचं साहित्य घेऊनच मंदिराच्या पायऱ्या चढल्याचा दावाही त्यांनी केला आहे. शबरीमाला मंदिराच्या गर्भगृहात जाताना पूजेची साहित्य घेऊन जाण्याची पंरपरा आहे. महत्त्वाचे म्हणजे अत्यंत वेगाने या पायऱ्या चढाव्या लागतात.

- Advertisement -

मंदिराचे विशेष शुध्दीकरण करणार

या वादानंतर काही वेळातच त्रावणकोर देवस्वोम बोर्डाचे सदस्य के पी शंकरदास देखील या पवित्र पायऱ्यावर पुजेचे साहित्य न घेता चढले. त्यामुळे आणखी वाद निर्माण झाला. दरम्यान शबरीमाला मंदिराचे तंत्री कंडारारु राजीवरु यांनी सांगितले आहे की, फक्त तंत्री आणि पूर्ववर्ती पंडालम शाही परिवाराचे सदस्य पुजेचे साहित्य न घेता पायऱ्या चढू शकतात. परंपरेचे उल्लंघन केल्यामुळे आता मंदिराचे विशेष शुध्दीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या – 

शबरीमाला मंदिरात विशेष पूजा; महिला पत्रकारांना मज्जाव

शबरीमाला मंदिर महिला प्रवेश; ४५० गुन्हे तर २०६१ जणांना अटक

शबरीमाला मंदिराची ८०० वर्षांची परंपरा मोडता मोडता राहिली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -