घरदेश-विदेशगोहत्येच्या संशयावरून उद्रेक, पोलिस निरिक्षकाचा मृत्यू

गोहत्येच्या संशयावरून उद्रेक, पोलिस निरिक्षकाचा मृत्यू

Subscribe

बुलंदशहरामध्ये गोहत्येवरून हिंसाचार झाला आहे. त्यामध्ये पोलिस निरिक्षक सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला आहे.

उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये गोहत्येच्या संशयावरून उद्रेक उडाला. त्यानंतर झालेल्या हिंसाचारामध्ये एका पोलिस निरिक्षकाला आपला जीव गमवावा लागला आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन केलं. वाहनांची तोडफोड केली. तसेच पोलिस स्टेशनवर हल्ला केला. पोलिस स्टेशनबाहेरील गाड्या देखील पेटवून दिल्या गेल्या. यावेळी पोलिस स्टेशनवर गोळीबार देखील केला गेला. यादरम्यान एका पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे.

बुलंदशहराकील एका गावात गोहत्या झाल्याची अफवा उठली. त्यानंतर आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले. आंदोलक हिंसक होताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात एक तरूण देखील जखमी झाला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी पोलिस ठाण्यावर हल्ला केला. यावेळी पोलिस निरिक्षक सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांनी गाडी पेटवून दिली. गोळीबार झाला. सध्या बुलंदशहरामध्ये प्रचंड तणाव आहे. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बुलंदशहरमधील हिंसक घटना लक्षात घेवून वाहतूक औरंगाबादहून जहांगिराबाद मार्गे वळवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -