घरदेश-विदेश'एमडीएच' मसाला किंग यांच्या निधनाची अफवा

‘एमडीएच’ मसाला किंग यांच्या निधनाची अफवा

Subscribe

मसाल्याचा बादशाह म्हणून ओळख असलेले 'एमडीएच' कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे नवी दिल्ली येथे निधन झाल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र त्यांची प्रकृती उत्तम असल्याचा व्हिडीओ गुलाटी यांच्या कुटुंबियांने जारी केला आहे.

‘एमडीएच’ कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाबाबतचे वृत्त खोट असल्याचे समोर आले आहे. महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या कुटुंबियांने एक व्हिडीओ जारी केला आहे. त्या व्हिडीओमध्ये त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे.

गुलाटी यांची प्रकृती उत्तम

नवी दिल्ली येथील एका खासगी रुग्णालयात गुलाटी यांच निधन झाल्याचं वृत्त रविवारी सकाळी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होत. मात्र ही अफवा असल्याचं स्पष्ट झाले आहे. महाशय धर्मपाल गुलाटी यांची प्रकृती उत्तम असल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. तसेच याबाबत ते स्वत: पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

गुलाटी यांच्याविषयी थोडक्यात

महाशय धर्मपाल गुलाटी हे मसाला किंग या नवानं प्रसिद्ध असलेले ‘एमडीएच’ कंपनीचे मालक आहेत. गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानातील सियालकोटमध्ये झाला आहे. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले आणि त्यानंतर त्यांनी मसाल्यांचा उद्योग सुरु केला. १९५९ मध्ये एमडीएच कंपनी सुरु केली आहे. भारतात ‘एमडीएच’च्या एकूण १५ कंपन्या आहेत. दुबई आणि लंडनमध्ये देखील या कंपनीची कार्यालये आहेत. ही मसाला कंपनी १०० देशांमध्ये उत्पादने निर्यात करत असून या कंपनीचा कारभार गुलाटी यांची मुल सांभाळत आहेत. तर मुलींवर या कंपनीच्या वितरणाची जबाबदारी देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -