घरदेश-विदेशभारतीय हवाई दलाचे 'एएन-३२'ची माहिती देणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस

भारतीय हवाई दलाचे ‘एएन-३२’ची माहिती देणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस

Subscribe

भारतीय हवाई दलाचे एएन-३२ हे विमान सोमवारी आसाममध्ये चीनच्या हद्दीलगत बेपत्ता झालेल्या विमानात ८ कर्मचारी आणि ५ जवान आहेत.

आसाममधून हवाई दलाचे एएन-३२ मालवाहतूक विमान सोमवारी ३ जून रोजी दुपारी बेपत्ता झाले आहे. हे विमान दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी जोरहाटहून निघाले होते. परंतु १ वाजेच्या सुमारास या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. या मालवाहू विमानानाचा हवाई दलाने शोध सर्वत्र सुरू केला, मात्र अद्याप शोध लागला नाही.

- Advertisement -

संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी याबाबत शिलाँगमध्ये माहिती देत हवाई दलाकडून विमानाची अचूक माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. एअर मार्शल आर. डी. माथूर, एओसी इन कमांड, इस्टर्न एअर कमांड यांनी या बेपत्ता विमानाची माहिती सांगणाऱ्यास पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली.

यावेळी, बेपत्ता विमानाच्या लोकेशनची माहिती 0378-3222164, 9436499477, 9402077267, 9402132477 या क्रमांकावर देता येईल, असे विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी सांगितले.

- Advertisement -

सोमवारी काही वेळातच उड्डाणानंतर भारतीय हवाई दलाचे एएन-३२ हे विमानआसाममध्ये चीनच्या हद्दीलगत बेपत्ता झाले. यामध्ये ८ कर्मचारी आणि ५ जवान आहेत. हे विमान आसामातील जोरहाट येथून अरुणाचल प्रदेशात जात होते. अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथील तळावर ते दुपारी १.३० वाजता पोहोचणे अपेक्षित होते. परंतु संपर्क तुटल्याने या विमानाची माहिती हवाई दलाला मिळाली नाही.

हवाई दलाने सर्व उपलब्ध यंत्रणा कामाला लावून एएन-३२ या विमानाचा शोध सुरू केला आहे. मात्र बेपत्ता झालेल्या भागात भागात कमी उंचीवरचे दाटलेले ढग आणि पावसामुळे शोधकार्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -