घरदेश-विदेशरशियामध्ये प्रथमच कोरोनावरील औषधाचा वापर होणार!

रशियामध्ये प्रथमच कोरोनावरील औषधाचा वापर होणार!

Subscribe

रशियाकडून COVID​​-19 च्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या पहिल्या औषधाला परवानगी मिळणार

कोरोनामुळे जगभरात गंभीर परिणाम झाला आहे. या साथीच्या आजाराने सर्वाधिक नुकसान झालेल्या देशांपैकी रशिया एक आहे. लोकांना या कोरोनापासून मुक्त करण्यासाठी रशियाने COVID​​-19 च्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या पहिल्या औषधाला परवानगी मिळणार आहे. या औषधोपचाराची सुरूवात पुढील आठवड्यापासून केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सला रशियन सरकारच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना औषधाला देण्यात आलेल्या परवानगीमुळे आरोग्य यंत्रणेवरील दबाव कमी होईल आणि सामान्य आर्थिक कामांना गती देखील मिळणार आहे.

- Advertisement -

रशियाच्या आरडीआयएफ सॉवरेन वेल्थ फंडच्या प्रमुखांनी एका मुलाखतीत सांगितले की, Avifavir नावाचे अँटिवायरल औषध रुग्णालयात रूग्णांना देण्यात कोणतीही हरकत नाही. तसेच औषध तयार करणारी कंपनी महिन्यात सुमारे ६० हजार लोकांवर उपचार करण्यासाठी पुरेसे औषध तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अद्याप COVID-19 ची कोणतीही यशस्वी लस तयार झाली नसून कोरोनामुळे होणा-या रोगावरील अनेक अँटीव्हायरल औषधांच्या मानवी चाचण्यांमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण यश आतापर्यंत आलेले नाही. GILD.O कंपनी रीमेड्सवीर नावाच्या नवीन अँटीवायरल औषधाने कोरोनाविरूद्ध अल्प प्रमाणात सकारात्मक परिणाम दिले आहेत. काही देशांमध्ये, आपत्कालीन वापराच्या नियमांनुसार रुग्णांना हे औषध दिले जात आहे.

- Advertisement -

आरडीआयएफचे प्रमुख किरील दिमित्रीज यांनी सांगितले की, हे औषध रशियन शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. तसेच, औषधांच्या क्लिनिकल चाचणीमध्ये ३३० लोकांचा समावेश करण्यात आला होता, या औषधाने बहुतेक प्रकरणांमध्ये कोरोनावरील यशस्वी उपचार ४ दिवसांत करण्यात आला, असे देखील त्यांनी सांगितले.

ही चाचणी साधारण आठवडाभरात संपणार होती, परंतु आरोग्य मंत्रालयाने विशेष प्रक्रियेअंतर्गत औषध वापरण्यास मान्यता दिली असून मार्चपासून उत्पादन सुरू करण्यात आले आहे.


महाराष्ट्रात कोरोनावरील SARS COV- 2 या लस चाचणीचा होणार ३० माकडांवर प्रयोग!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -