रूसच्या खाणीत सापडला हिऱ्यामध्ये हिरा; इतिहासातील पहिलीच घटना

या मॅट्रीओशका हिऱ्याचे वजन ०.६२ कॅऱेट एवढे आहे तर या हिऱ्यात असणाऱ्या हिऱ्याचे वजन हे ०.०२ कॅरेट आहे.

siberia

सायबेरियातील एका खाणीमध्ये हिऱ्यामध्ये हिरा सापडला आहे. इतिहासात अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडल्याचे सांगण्यात येत आहे. रूस अर्थात रशियातील अलरोसा पीजेएससी कंपनीने शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिली आहे. हा हिरा काही विशेष असून या हिऱ्यामध्ये एक फिरणारा हिरा असून तो पुर्णतः वेगळा असण्याचे सांगण्यात येत आहे. अलरोसाने या हिऱ्याबद्दल माहिती देताना असे सांगितले की, हा हिरा ८० दशलक्ष वर्षांहून अधिक जुना असू शकतो. या मॅट्रीओशका हिऱ्याचे वजन ०.६२ कॅऱेट एवढे आहे तर या हिऱ्यात असणाऱ्या हिऱ्याचे वजन हे ०.०२ कॅरेट आहे.

अलसोरा कंपनीतील ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट जियोलॉजिकल एंटरप्राईज’च्या उपनिर्देशक असणाऱ्या ओलेग कोवलचुक यांनी असे सांगितले की, हा एक वैश्विक हिरा असून हिऱ्याच्या खाणीतील इतिहासातील हा पहिलाच प्रकार असून आतापर्यंत असा हिरा कधीच सापडला नव्हता.

हा हिरा सायबेरियाई क्षेत्र यकुशियाच्या न्युरबाच्या खाणीमध्ये सापडला असला तरी या हिऱ्याला याकुत्स्क डायमंड ट्रेड एंटरप्राईजने घडवले आहे. एक्स-रे मायक्रोटोमोग्राफी आणि स्पेक्ट्रोस्कोपी यासारख्या पद्धतींचा वापर करून वैज्ञानिकांनी या हिऱ्याची तपासणी केली आहे.