‘ए वतन… हमको तेरी कसम…’; रशियाच्या जवानांकडून हिंदी गाणं सादर!

Mumbai

बॉलीवूड गाण्यांची लोकप्रियता साता समुद्रापार गेली असल्याची अनेक उदाहरण आपण यापूर्वी पाहिली आहेत. मात्र देशभक्तीपर गाण्यांची भुरळ परदेशातील आर्मी जवानांना पडली असल्याचे आगळे वेगळे उदाहरण आता समोर आले आहे. रशियातील मिलिटरी कॅडेटने चक्क हिंदी गाण्याचा सूर आळवलेला एक व्हिडिओ इंडियन आर्मीच्या सौजन्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये १९६५ सालच्या शहिद चित्रपटातील ए वतन ए वतन हमको तेरी कसम… हे गाण सर्व जवान एका सूरात आणि लयीत म्हणताना दिसत आहे. त्यांच्या या व्हिडिओचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

मनोज कुमार यांचे लोकप्रिय गीत 

हिंदी सिनेसृष्टीत भारतकुमार म्हणून ओळख असलेल्या अभिनेत मनोज कुमार यांच्या १९६५ साली आलेल्या शहिद चित्रपटातील ए वतन ए वतन हमको तेरी कसम… हे गाणं आहे. शहिद भगत सिंग यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून यामध्ये मनोज कुमार यांनी भगत सिंग यांची भूमिका साकारली आहे. देशासाठी वयाच्या २३ व्या वर्षी प्राणाची आहुती देणाऱ्या एका देशभक्ताने हे गाणं गायलं असल्याचे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या गाण्याला मोहम्मद रफी यांनी स्वरबद्ध केले असून प्रेम धवन यांनी गाण्याला संगीत दिले आहे.

हेही वाचा –

नाना पटोले विरूद्ध किसन कथोरे; विधानसभा अध्यक्षपदासाठी चुरस