जमिनीवर झोपल्यामुळे कर्मचाऱ्यांचे निलंबन

स्पेन येथील मलागा विमानतळावर मुलभूत सुविधा न मिळाल्याने कर्मचारी जमिनीवर झोपले होते. जमिनीवर झोपल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे कंपनीने निलंबनाची कारवाई केली आहे.

Spain
Ryanair employees
जमीनीवर झोपलेले कर्मचाऱी

आयरिश वाहक कंपनी ‘रायनियर’ने आपल्या सहा कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. स्पेनमधील एका विमानतळावर गणवेशात जमिनीवर झोपल्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याचे कंपनी सांगितले आहे. कर्मचारी जमिनीवर झोपल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कर्मचाऱ्यांमध्ये विमान चालकाचाही समावेश आहे. खराब हवामान असल्यामुळे हे कर्मचारी स्पेनमधील मलागा विमानतळावर अडकले होते. विमानतळावर त्यांना राहण्याची मुलभूत सेवा मिळाली नाही म्हणून कर्मचारी जमिनीवर झोपले असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र रहाण्याची सेवा कंपनीकडून का दिली गेली नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

काय आहे पूर्ण घटना

‘रायनियर’ ही एक कार्गो विमान वाहतूक करणारी कंपनी आहे. ही मूळ आयर्लंड येथील कपनी असून डब्लिन येथे त्याचे मुख्यालय आहे. या कंपनीचे कार्गो विमान स्पेन आणि पोर्तुगाल या ठिकाणी सामानाची वाहतूक करतात. स्पेनमध्ये वादळ असल्यामुळे तेथील विमान वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला होता. हे कर्मचारी स्पेनच्या मलागा विमानतळावर अडकले होते. कंपनीच्या वतीने त्यांची राहाण्याची सोय करण्यात आली नसल्याने त्यांना VIP वेटिंगरूममध्ये थांबवण्यात आले. वेटिंगरूममध्ये फक्त खूर्च्या आणि सोफे असल्याने कर्मचाऱ्यांनी रूमची मागणी केली. प्रवाशांची गर्दी असल्यामुळे कर्मचाऱ्यांना जागा उपलब्ध झाली नाही. यासाठी त्यांनी रात्र जमिनीवर झोपून काढली. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

“जमिनीवर झोपलेल्या सहा कर्मचाऱ्यांना कंपनीने ५ नोव्हेंबर रोजी निलंबित केले आहे. कर्मचाऱ्यांचे असभ्य वर्तन आणि बेशिस्तीमुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. कंपनीने त्यांच्यासाठी राहाण्याची सोय केली असतानाही जमिनीवर झोपून त्यांनी कंपनीचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला आहे.” – कंपनी प्रवक्ता

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here