घरट्रेंडिंगVIDEO : बॉलरने विकेट घेतल्यानंतर प्रेक्षकांना भन्नाट जादू दाखवली!

VIDEO : बॉलरने विकेट घेतल्यानंतर प्रेक्षकांना भन्नाट जादू दाखवली!

Subscribe

समोरच्या बॅट्समनची विकेट काढल्यानंतर एका बॉलरने धम्माल जादू दाखवत उपस्थितांना अवाक करून सोडलं!

क्रिकेटच्या सामन्यात कुणा फलंदाजाने तुफान फटकेबाजी केली किंवा कुणा गोलंदाजाने अविश्वसनीय गोलंदाजी करत समोरच्या फलंदाजाची दाणादाण उडवून दिली, की आपण म्हणतो ‘या फलंदाज किंवा गोलंदाजाचा जादुई परफॉर्मन्स होता!’ पण एका गोलंदाजानं मैदानावर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत लाईव्ह टेलिकास्टमध्ये भर मैदानात जादू केली! आणि ही त्याच्या गोलंदाजीमध्ये नसून एखाद्या जादूगारासारखी ही जादू होती. हा गोलंदाज आहे दक्षिण आफ्रिकेचा. हा सामना होता दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० सुपर लीगमधल्या पर्ल रॉक्स आणि दर्बन हीट या दोन संघांमधला. आणि गोलंदाज खेळाडू होता जादुगारी ट्रिक्सची आवड असणारा तबरेझ शम्सी! या पठ्ठ्यानं मॅचमध्ये विरोधी टीमच्या फलंदाजाला बाद केल्यानंतर सेलिब्रेट करताना एका छोट्याशा लाल रंगाच्या रुमालातून थेट एक मोठी काठीच बाहेर काढली आणि मैदानातल्या प्रत्येकालाच धक्का बसला! याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नक्की झालं काय?

पर्ल रॉक्स आणि दर्बन हीट या संघांमध्ये सुरू असलेल्या टी-२० मॅचमध्ये ८व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. विहाब लुब्बे या फलंदाजाला शम्सीने टाकलेला चेंडू थेट लाँग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात अलगद स्थिरावला. पण सगळ्यांचं लक्ष शम्सीवरच खिळलेलं होतं. नेहमीच काहीतरी भन्नाट स्टाईलमध्ये सेलिब्रेट करण्यासाठी शम्सी फेमस आहे. याहीवेळी शम्सीने खिशातून लाल रंगाचा छोटासा रुमाल काढला. प्रेक्षकांसह समालोचकांचं देखील लक्ष या रुमालाकडे लागलं होतं. बघता बघता या रुमालातून एक लांबलचक काठीच बाहेर आली आणि सगळ्यांचेच डोळे विस्फारले!

- Advertisement -

खरंतर शम्सीला लहानपणापासून जादूगार बनण्याची इच्छा होती. पण क्रिकेटवरच्या त्याच्या प्रेमामुळे तो गोलंदाज झाला. खुद्द शम्सीनंच ही बाब या मॅचनंतर सांगितली आहे. आता शम्सीच्या या ‘परफॉर्मन्समुळे’ दक्षिण आफ्रिकेच्या या ‘अद्भुत’ खेळाडूचा खेळ आणि त्याचं अजब सेलिब्रेशन आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सामन्यांमध्ये पाहायला मिळण्याचीही शक्यता आहे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -