घरदेश-विदेशतृप्ती देसाईंना कोची विमानतळावर रोखलं

तृप्ती देसाईंना कोची विमानतळावर रोखलं

Subscribe

तृप्ती देसाई यांना शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेश देणार नाही अशी भूमिका भक्तांनी घेत आंदोलन केलं आहे. त्यामुळे तृप्ती देसाई कोची विमानतळावर अडकून पडल्या आहेत.

शबरीमाला मंदिरामध्ये १० ते ५० वयोगटातील महिलांच्या मंदिर प्रवेशावरून सुरू झालेला वाद अद्याप देखील थांबलेला नाही. १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेश द्यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर भक्तांनी मात्र त्याला विरोध करत आंदोलकांची भूमिका घेतली आहे. दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई काही महिला कार्यकर्त्यांसह शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी कोची विमानतळावर दाखल झाल्या आहेत. पण, भक्तांनी  मात्र त्याला कडाडून विरोध केला आहे. भक्तांनी केलेल्या आंदोलनामुळे तृप्ती देसाई सध्या कोची विमानतळावर अडकून पडल्या आहेत. भक्तांनी त्यांना विमानतळाबाहेर येऊ देणार नाही त्यांनी तिथूनच परतावे अशी भूमिका घेतली आहे. तर, दुसरीकडे टॅक्सी चालकांनी देखील त्यांना कोची विमानतळाबाहेर काढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळला आहे. दरम्यान, पोलिसांनी तृप्ती देसाईंच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे. पहाटे ५ वाजता तृप्ती देसाईंनी पुणे विमानतळावरून कोचीकरता विमान पकडले. पण भक्तांनी मात्र त्यांना कडाडून विरोध केला आहे.

‘जोवर अयप्पाचं दर्शन होत नाही तोवर मी मागे फिरणार नाही’ अशी भूमिका भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी घेतली आहे. त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असल्याचं तृप्ती देसाई यांचं म्हणणं आहे. यापूर्वी शनिशिंगणापूरमध्ये देखील महिलांना प्रवेश मिळावा यासाठी तृप्ती देसाई यांनी आंदोलन केलं होतं.

- Advertisement -

वाचा – शबरीमाला मंदिर महिला प्रवेश; ४५० गुन्हे तर २०६१ जणांना अटक

काय आहे शबरीमाला वाद

शबरीमालामध्ये १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला. पण, भक्तांनी मात्र त्याला विरोध केला. आंदोलन उभारले. हजारो आंदोलकांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. पण, त्यानंतर देखील भक्तांनी आंदोलकांची भूमिका घेतली आहे. सध्या शबरीमाला मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वाचा – शबरीमला मंदिर सर्वधर्मीयांसाठी खुलं – न्यायालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -