घरदेश-विदेशशबरीमला मंदिरात पाच महिलांना प्रवेश नाकारला

शबरीमला मंदिरात पाच महिलांना प्रवेश नाकारला

Subscribe

शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावर वाद सुरु आहे. त्यामुळे मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

केरळमधील शबरीमला मंदिराच्या तीर्थयात्रेला आजपासून सुरुवात झाली असून पुढील ४१ दिवस ही यात्रा सुरु राहणार आहे. दरम्यान आज सायंकाळी ५ वाजता शबरीमला मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. अय्यप्पाच्या शेकडो भक्तांनी मंदिराच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. दरम्यान, शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावर वाद सुरु आहे. त्यामुळे मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

यात्रेतील पांभा येथील बेस कॅम्पवर मोठ्या संख्येने भक्त उपस्थित आहेत. यात्रेत पुरुषांबरोबर वयोवृद्ध महिला मोठ्या संख्येने आल्या आहेत. दरम्यान पोलिसांकडून महिलांच्या वयाचा पुरावा मागण्यात येत आहे. यावेळी मंदिरात जाण्यासाठी आलेल्या पाच महिलांना पोलिसांनी मागे पाठवून दिले आहे. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने १० ते ५० वयोगटातील महिलांना सोडायचे नाही असा आपल्याला स्पष्ट आदेश असल्याचे सांगितले. मंदिरात प्रवेश करण्यासाठी येणाऱ्या महिलांना संरक्षण न देण्याचा निर्णय राज्य सरकारने आधीच घेतला आहे. दरम्यान शबरीमला कर्मा समितीनेसुद्धा महिलांना मंदिरात प्रवेश करु न देण्याविषयी म्हटले आहे.

- Advertisement -

तृप्ती देसाई देणार शबरीमला मंदिराला भेट

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश द्यायचा की, नाही यावरुन वाद सुरु आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान तृप्ती देसाई यांनी मात्र आपण २० नोव्हेंबरनंतर शबरीमला मंदिराला भेट देणार असल्याचं म्हटलं आहे. “२० नोव्हेंबरनंतर मी शबरीमला मंदिरात दर्शनासाठी जाईन. मंदिरात जाण्याआधी आम्ही केरळ सरकारकडे संरक्षणाची मागणी करु. आता संरक्षण द्यायचे की, नाही ते त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यांनी संरक्षण दिले नाही तरी मी मंदिरात जाणारचं” असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -